Vidyanand Bapat Marathi News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) चांगलेच चर्चेत आले आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट यांना मारहाण देखील करण्यात आली आहे. काल (गुरूवारी, ता ३) पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असतानाच त्यांना मारहाण करण्यात आली. तर आता बापट यांना काही राजकीय नेत्यांनी, संघटनांनी आणि पक्षांनी पाठिंबा दिला आहे, तर काही नेत्यांनी विद्यानंद बापट यांच्यावरती टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. (Rupali Patil Thombare on Pune DJ Ban)

Continues below advertisement

Rupali Patil Thombare: पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं!

रूपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलं आहे की, "अरे देवा बापट नावाने पुणेकर म्हणून गंडावले की झाले असे सध्या गाजत असलेले विद्यानंद बापट हे पुणेकर नाहीत म्हणून गणपती बाप्पा उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली. पुणे म्हणजे काय हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं! रत्नागिरीहून 7 वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीला आलेल्या माणसाने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये. आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान - पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार. पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्योत्सव गणपती कार्यकर्ता नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, श्रीमंत थोरले,बाजीराव रस्त्यावर लहानाचे मोठे झालेत.पेठेत घराघरांतून,दुकानातून वर्गणी काढून गणपती बाप्पा उत्सव साजरे करण्याचा 130 वर्षाची परंपरा आहे हो. इथे ढोलाच्या थापेवर कार्यकर्त्यांचे बालपण गेलंय, गणपतीच्या वर्गणीसाठी गणपती कार्यकर्ते उन्हात फिरले 130 वर्षांची ही परंपरा आहे, फक्त DJ चा विषयच नाही. पुण्यात राहायचं असेल तर पुण्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल, तिला विरोध करून प्रसिद्धी मिळवता येणार नाही. नाहक प्रसिद्धीच्या नादात आमच्या पुण्याचे नाव खराब नको आमच्या गणपती उत्सवाला गालबोट नको. आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान - पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार. पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे. तो जोशात आनंदात संपन्न होणारच, अशा शब्दात रूपाली ठोंबरेंनी बापटांना सुनावलं आहे.(Rupali Patil Thombare on Pune DJ Ban)

Continues below advertisement

Rupali Patil Thombare:  तर बापटांना झालेल्या मारहाणीवरती रूपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया 

विद्यानंद बापट यांना ज्यांनी मारहाण केली त्यांचा कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. पण आमचे सण हे अत्यंत जोशात आनंदात नियमात संपन्न पार पडलेच जाणार. आमच्या सणांना गालबोट नको. दहीहंडी 1 दिवस संध्याकाळी 6 ते 10 गणपती बाप्पा उसत्व 10 दिवस नियमात राहून केला जातो. आणि हा दहीहंडी ,गणपती उसत्व पेठेत वर्षानुवर्षे उत्साहात साजरा होतो, असंही ठोंबरेंनी म्हटलं आहे. 

विद्यानंद बापट यांच्यावर उचललेला हात कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखा नाही. हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी आपल्या पुण्यातील सण-उत्सवांचे पावित्र्य, आपली संस्कृती आणि परंपरा जपलीच गेली पाहिजे. प्रशासनाने कायद्याने दिलेल्या परवानगीच्या चौकटीत आपले, सण पूर्ण जोशात आणि उत्साहात,सुरक्षितपणे साजरे झाले पाहिजेत. सोशल मीडियावरचे अर्धवट ज्ञान, व्हायरल व्हिडिओ किंवा स्वतःच्या सोयीचे कायद्याचे अर्थ सांगणाऱ्या व्यक्तींच्या दबावाला प्रशासनाने बळी पडू नये. कायदा हा सोशल मीडिया ठरवत नाही; कायदा आणि सक्षम प्रशासन ठरवते. त्यामुळे संबंधित प्रकरणात उपलब्ध पुरावे, प्रत्यक्ष परिस्थिती, कायदेशीर तरतुदी आणि परवानगीच्या अटी तपासूनच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. हिंसा नको, पण आमच्या संस्कृतीवरही गदा नको!कायदा पाळू, संस्कृती जपू आणि सण उत्साहात साजरे करू, असं आवाहन देखील रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलं आहे.