नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातच्या 'शिवनिका' संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.शिवनिकासंस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे, रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

'शिवनिका' संस्थेचे सर्व सदस्य चौकशीच्या फेऱ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने स्थापन केलेल्या 'शिवनिका' संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम पार पडले होते. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत.

रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ?

अशोक खरात प्रकरणावरून आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खरातशी असलेल्या कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर, एसआयटी आता चाकणकर यांचीही चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याबाबतचे समन्स धाडण्यात आले असून, त्यांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात.

Continues below advertisement

आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी

एसआयटीने 'शिवनिका' संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवण्यात आला आणि यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. खरातच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत असताना, आता या संस्थेच्या चौकशीमुळे अनेक 'पांढरपेशी' चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'शिवनिका' (Shivanika) या संस्थेच्या विश्वस्त मंडळातील नावे

कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरातडॉ. जितेंद्र गणपतराव शेळकेसौ. कल्पना अशोककुमार खरातना. सौ. रूपाली निलेश चाकणकरश्री. सुभाषराव केशवराव जमेश्री. ललित प्रकाश गोफणे (C.A.)डॉ. नंदकिशोर तुकाराम काटोरे