एक्स्प्लोर

Rupali Chakankar and Ashok Kharat: आधी म्हणाल्या ते माझे गुरु होते, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर पत्रकारपरिषदेत नेमकं काय म्हणाल्या?

Rupali Chakankar resignation: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Rupali Chakankar resignation: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर टीका करत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. (Maharashtra Politics news)

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?

शिवनिका संस्थानमध्ये मी प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून सदस्य म्हणून ट्रस्टवर काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर या ट्रस्टवर होते. मी ट्रस्टची सदस्य होते, त्यानंतर मी महिला आयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात आला होता. समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. तिथे होणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहायचो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलं, त्यानिमित्ताने आम्ही कुटुंब उपस्थित राहत होतो. माध्यमांकडून दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमोच्यानिमित्ताने पाद्यपूजा अनेकांनी केली, तशी मी आणि माझ्या पतीनेही केली. पाच-सहा वर्षांपूर्वी आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात असतो, ते पाच-सहा वर्षांनी एखाद्याचे कृत्य, वैयक्तिक वागणूक, वैयक्तिक आयुष्य याबद्दल आपल्याला सुतराम कल्पना नसते. आज जे आपल्यासोबत आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागतील, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजल्यावर मला धक्का बसला. मी लगेच ट्विटही केलं. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे. पण अशोक खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती असायचं कोणतंही कारण नव्हतं. या प्रकरणात पोलिसांनी खोलवर आणि निष्पक्ष तपास करावा, हे मी आधीच सांगितले आहे. मी पोलीस महासंचालकांना भेटून तपासाबाबत पत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी भेटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेता सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हावा, यासाठी मागणी केली.

आपण काही लोकांवर विश्वास ठेवता, अध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे, घाणेरडं आहे, त्याचं आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी.  माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचं वाईट वाटतंय, अशी खंत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा

'मोठेमोठे गार केले गंमतमधी...' सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट अन् व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; रुपाली चाकणकरांना डिवचलं, म्हणाल्या....

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget