एक्स्प्लोर

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य, 10 तारखेच्या पत्रकार परिषदेत बडा गौप्यस्फोट होणार?

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अशातच विलीनीकरण, अजित पवार यांच्या अपघाताबाबत व्यक्त होणाऱ्या शंका याबाबत रोहित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे.

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी अपघाताबाबात शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवार मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले होते. यादरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला आणि मोठा स्फोट होऊन सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता पवार कुटुंब एकत्र येताना दिसत आहे. अशातच विलीनीकरण, अजित पवार यांच्या अपघाताबाबत व्यक्त होणाऱ्या शंका याबाबत रोहित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे.(Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash)

अजित दादांची काही इच्छा होती....

अपघाताबद्दलच्या शंकांवर मी दहा तारखेला बोलेन, त्याचबरोबर विलीनीकरणावर अजित दादांची काय इच्छा होती, ती 12 तारखेला सांगणार असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अजित दादांची काही इच्छा होती ते पत्रकार परिषद घेऊन मी सांगणार असंही त्यांनी म्हटले आहे. विलीनीकरणाबाबत नेमकं काय घडलं तेही ते पत्रकार परिषदेत सांगणार आहेत. दहा तारखेला विमानाबद्दलच्या शंका ज्या आमच्या मनात आहेत, त्या शंका मी मुंबईत प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांसमोर मांडेल, विलीनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगेन, 12 तारीख का? तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती कशी होती याबद्दल मी बोलेन, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.(Ajit Pawar Plane Crash) 

दोन्ही परिवारामध्ये कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही

अजून पर्यंत सुनेत्र काकी, पार्थ, जय किंवा आम्ही असो, कोणीही या दुःखातून सावरलेला नाही. राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने येत नाही येत. कारण घटनाच इतकी दुर्दैवी घडलेली आहे. त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये येईल, नक्कीच त्याबद्दल मी स्पष्टपणे मांडेल, पण आतापर्यंत दोन्ही परिवारामध्ये कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही. नऊ तारखेनंतर त्या चर्चांना कुठेतरी सुरुवात होईल, असं मला वाटतं असेही पुढे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.(Ajit Pawar Plane Crash) 

सगळ्यांच्या मनात शंका आहे. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. का घडलं, कसं घडलं असावं, याबाबत दहा तारखेला सविस्तर बोलणार आहे. अमोल मिटकरी हे दादांचा जवळचा कार्यकर्ता होता. काही गोष्टी योग्य पद्धतीने मांडत आहेत, काही विषयाच्या बाबतीत ते भावनिक आहेत. भावनिकतेच्या भरात अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. काही गोष्टी प्रेझेंटेशनमध्ये मांडेन किंवा पत्रकार परिषद घेऊन सांगेन, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.(Ajit Pawar Plane Crash) 

दादांचे जे स्वप्न होते की...

रोहित पवार यांनी म्हटले की, दादांचे जे स्वप्न होते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दादांचे जे कार्यकर्ते आहेत ते जास्तीत जास्त निवडून यावेत, ही त्यावेळीची त्यांची इच्छा आणि स्वप्न आज आपल्याला म्हणावे लागेल की, ते त्यांचे अंतिम स्वप्न होतं. आज मी माझ्या परिवारासोबत येऊन मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. मला विश्वास आहे की, दादांचे जे स्वप्न होते की, जिल्हा परिषदेला त्यांचे कार्यकर्ते जास्त निवडून येतील ते स्वप्न मतदार आणि कार्येकर्ते पूर्ण करतील. अजित पवारांची जी इच्छा होती, परिवार म्हणून सर्वजण एकत्र यायला हवे आणि त्याकरिता दादांकडूनही प्रयत्न केला जात होता. सुप्रिया ताई असतील किंवा पवार साहेब आम्ही सर्वजण काहीसा असाच प्रयत्न करत होतो. पवार म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि अजित दादांचे जे स्वप्न आहे पवार कुटुंब एकत्र राहिले पाहिजे तसेच काहीतरी होईल. आज कोणीही न ठरवून सर्वजण एकत्र आले. परिवार पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget