एक्स्प्लोर

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: बेंगळुरू येथील 'राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड'चे मालक राजेश मेहता यांच्यावर 15 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. यावरून रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय.

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 15 लाख कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याने संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला असून, या प्रकरणात आता राजकीय ठिणगी पडली आहे. बेंगळुरू येथील 'राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड'चे (Rajesh Exports Limited) मालक राजेश मेहता (Rajesh Mehta) यांच्यावर या महाघोटाळ्याचा आरोप आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट करत, थेट एलआयसीच्या (LIC) भूमिकेवर रोकडा सवाल उपस्थित केलाय.

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: रोहित पवार यांचे ट्विट 

आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा Accounting घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्यूचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LIC ने गुंतवणूक केलीच कशी? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून SEBI सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झाले आहे. यात सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे LIC चा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे.”

Rajesh Mehta Scam: नेमकं प्रकरण काय? 

शेअर बाजार नियामक संस्था सेबीने (SEBI) बेंगळुरू येथील प्रसिद्ध ज्वेलरी कंपनी 'राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड' आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (MD) राजेश मेहता यांच्याविरोधात एक अंतरिम आदेश जारी केला आहे. सेबीच्या प्राथमिक तपासानुसार, राजेश एक्स्पोर्ट्सने आर्थिक वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत आपल्या परदेशी उपकंपन्यांच्या माध्यमातून तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या एकूण महसुलाची चुकीची आणि फुगवून सांगितलेली माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कंपनीने आपला तब्बल 99.8 टक्के महसूल केवळ कागदावर वाढवून दाखवल्याचे सेबीचे म्हणणे आहे. प्रमोटर्सच्या माध्यमातून निधीचा चुकीचा वापर करणे आणि चुकीची आर्थिक माहिती देणे, असे गंभीर आरोप कंपनीसह मेहतांवर लावण्यात आले आहेत. या आदेशानंतर सेबीने राजेश मेहता आणि त्यांच्या कंपनीला शेअर बाजारात व्यवहार करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.

Rajesh Mehta Scam: एलआयसीची (LIC) गुंतवणूक आणि सर्वसामान्यांचा पैसा

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा आक्षेप एलआयसीच्या गुंतवणुकीवर घेतला जात आहे. बाजारातील इतर आघाडीच्या म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत या कंपनीत गुंतवणूक करणे टाळले असताना, देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीने म्हणजेच 'एलआयसी'ने (LIC) या कंपनीत 10 टक्क्यांहून अधिक भागभांडवल खरेदी केले होते. कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत असतानाही एलआयसीने आपली गुंतवणूक कायम ठेवल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Who is Rajesh Mehta? कोण आहे राजेश मेहता? 

राजेश मेहता यांचा जन्म 20 जून 2964 रोजी बेंगळुरू येथे झाला. ते 'राजेश एक्स्पोर्ट्स' या सोन्याच्या क्षेत्रातील देशातील एका नावाजलेल्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. बेंगळुरूच्या सेंट जोसेफ या नामांकित शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अगदी कमी वयात वडिलांच्या सराफा व्यवसायात पाऊल ठेवले. 1980 च्या दशकात राजेश मेहता यांनी आपले भाऊ प्रशांत यांच्यासोबत चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून अवघे 1,200 रुपये उधार घेतले होते. त्यानंतर त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करत जागतिक स्तरावर सोन्याच्या शुद्धीकरणातील सर्वात मोठी कंपनी 'व्हॅलकाम्बी' विकत घेण्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, आता सेबीच्या या धडक कारवाईमुळे आणि अब्जावधी रुपयांच्या कथित 'अकाउंटिंग' घोटाळ्यामुळे राजेश मेहता आणि त्यांची कंपनी पूर्णपणे अडचणीत आली असून, विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, कुटुंबाने छ. संभाजीनगरमधील घर सोडलं, नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget