बारामती: महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) प्रचारासाठी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) प्रचार करत आहेत. मात्र ते भाजपवर निशाणा साधत आहेत. करुणा मुंडे यांच्या उमेदवारीवरून रोहित पवारांनी भाजपाला लक्ष केलं. तर भाजपचे नेते सुनेत्रा काकींचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. परंतु असं करण्यामागे त्यांचा उद्देश वेगळा काय आहे हे माहीत नाही. पण जर तसं असेल तर त्यांनी बारामतीकरांना ओळखलं नाही असा टोला रोहित पवारांनी भाजपला लावला आहे. तर रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला यासंबंधी चंद्रकांत पाटील यांना विचारला असता ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सुनेत्रा पवारांचा प्रचार आता रोहित पवार काय करत आहेत मात्र पुढे काय करतील हे सांगता येत नाही असं म्हणत रोहित पवारांना कोपरखळ्या लावल्यात. त्यामुळे भाजपने देखील रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे रोहित पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारास उतरले असले तरी भाजपला टार्गेट करण्याला करायला ते विसरले नाहीत.

Rohit Pawar: करूणा शर्मांच्या उमेदवारीवर काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी काल बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यांनी गाव भेट दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्या दरम्यान बोलताना रोहित पवार म्हणाले, खरंतर बारामती पोटनिवडणुकीमध्ये जे 22 ते 23 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. ते राहिला नको होते. अजित पवार यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून जो उमेदवारीचा आकडा 60 होता तो 22 ते 23 वर आणला. मात्र अपक्ष उमेदवारांची नावे राहिली आहेत. त्यातील एक नाव मी पाहिलं तर ते करुणा मुंडे यांचे आहे. त्यांना भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याने त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवला नसता. याच्या मागचं कारण असं की महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि त्यावेळी आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून अजित पवार यांना विरोधी पक्ष नेता म्हणून निवडलं होतं. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे हे भाजपवर जोरदार टीका करत होते. ज्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाजपा विरुद्ध बोलत होते. त्याच अधिवेशनात एका भाजपच्या मोठ्या नेत्याने करुणा मुंडे यांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि त्या पत्रकारांशी बोलल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका करणे सोडून दिलं. त्यामुळे मला वाटतं की भाजपच्या कोणत्याही नेत्याने करुणा मुंडे यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता. मात्र तरी देखील लोक हुशार आहेत. ज्या लोकांनी बाहेरून येऊन या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना एकही मतदान पडणार नाही. आणि जे बारामती मधील उमेदवार आहेत. त्यांचे स्वतःचे मतदान सोडलं तर त्यांच्या कुटुंबातील देखील मतदान त्यांना पडणार नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar: रोहित पवारांनी काय म्हटलं अन् चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया

‘बारामतीत बाहेरून येऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’ असे सांगत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केल्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही रोहित पवार यांना डिवचलं आहे. रोहित पवार यांनी ‘बारामतीत बाहेरून येऊन समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’ अशी टिप्पणी भाजपचा नामोल्लेख न करता केली. चंद्रकांत पाटील हेदेखील बुधवारी बारामती दौऱ्यावर होते. प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ‘आपल्या संस्कृतीनुसार राजकीय मतभेद असले, तरी कुटुंबातील कार्यक्रमामध्ये सर्वजण एकत्र येतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असल्याने आमदार रोहित पवार प्रचार करतील. मात्र, पुढे काय होईल, ते पाहावे लागेल,’ असे सांगत रोहित पवार यांना डिवचले. 

Baramati bypoll 2026 : बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 जण शड्डू ठोकणारे कोण?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवार मैदानात आहेत.  त्यातील फक्त दहा उमेदवार हे बारामती (Baramati bypoll 2026) विधानसभा मतदारसंघातील आहेत. बाकी अन्य उमेदवार हे सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, पुणे या भागातील आहेत.  बारामती विधानसभा मतदारसंघाबाहेरील 13 उमेदवार निवडणुकीच्या (Baramati Candidates) रिंगणात उभे आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. (Maharashtra Politics News)

Baramati bypoll 2026 : बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026मतमोजणी : 4 मे 2026निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

Baramati news: बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार कोण?

1) सुनेत्रा अजित पवारपत्ता: बारामतीपक्ष: नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचिन्ह: घड्याळ

2) प्रा. आर. वाय घटूगडे सरपत्ता: मु.पो. घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूरपक्ष: न्यू रागष्ट्रीय समाज पार्टीचिन्ह: शिट्टी

3) सतीश कृष्णा कदमपत्ता: नं. ४४५, ९० फूट हनुमान गुरुकुल नगर, बिरूळ ता. जतपक्ष: हिंदुस्तान जनता पार्टीचिन्ह: हिरा

4) डॉ. अभिजीत  बिचुकलेपत्ता: १३४, विवेक गार्डन अपार्टमेंट, केसकर पेठ, सातारापक्ष: अपक्षचिन्ह: दूरदर्शन

5) अॅड. अविनाश गायकवाडपत्ता: प्रगती नगर, बारामतीपक्ष: अपक्षचिन्ह: साखळी

6) करुणा धनंजय मुंडेउत्तम नगर, बीड अपक्ष    चिन्ह: एअर कंडिशनर

7) गजानन पाटीलपत्ता: येवलेवाडी पुणेपक्ष: अपक्षचिन्ह: लिफाफा

8) चंद्रकांत रांगाजी मोटेपत्ता: अंबरनाथ पक्ष: अपक्षचिन्ह: कॅमेरा

9) चंद्रकांत वाघमोडेपत्ता: माळेगाव बारामतीपक्ष: अपक्षचिन्ह: प्रेशर कुकर  

10) दत्तात्रय बेदरे पत्ता-बठाण ता. मंगळवेढा जी. सोलापूर चिन्ह: सीसीटीव्ही कॅमेरा

11) बाळासो मारुती धापटे पत्ता भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अपक्ष उमेदवार चिन्ह सफरचंद 

12) मिथुन सोपान आटोळे पत्ता खांडज ता.बारामती अपक्ष चिन्ह: बुद्धिबळपट

13) मंगलदास तुकाराम निकाळजे पत्ता प्रबुद्ध नगर बारामती अपक्ष उमेदवार चिन्ह फळांची टोपली

14) योगेश मोहन उल्हासनगर अपक्ष उमेदवार चिन्ह बासरी

15) भोसले रोहित राजूपत्ता- निरा वागज बारामतीअपक्ष उमेदवार चिन्ह: बॅट

16) डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसेपत्ता साठे नगर बारामती अपक्ष उमेदवार चिन्ह: रोड रोलर

17) विराज महादेव शिंदे पत्ता आमराई बारामती अपक्ष उमेदवार चिन्ह: गॅस सिलेंडर

18) शिवाजी कोकरे पत्ता पणदरे बारामती अपक्ष उमेदवार चिन्ह: ट्रक

19) सतीश सोनवणेपत्ता चेंबूरअपक्ष उमेदवार चिन्ह: खाट

20) सागर शरद भिसेपत्ता सदर बाजार सातारा अपक्ष उमेदवार  चिन्ह: ट्रम्पेट

21) साजन भगवान आडसुळ पत्ता दादासो नगर बारामतीअपक्ष उमेदवार चिन्ह: किटली

22) सीताराम विठ्ठल रणदिवे पत्ता-  दत्तनगर तुंगत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अपक्ष उमेदवार  चिन्ह -बॅटरी टॉर्च

23) सोनाली राणे पत्ता- कल्याण अपक्ष उमेदवार चिन्ह: कपाट