एक्स्प्लोर

Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल

Rohit Pawar and Naresh Arora: रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी गंभीर आरोप केले. पायलटने जाणीवपूर्वक विमान जमिनीवर आदळले.

Rohit Pawar and Naresh Arora: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे (Ajit Pawar Plane Crash) कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप मला का ट्रोल करत आहे. समित ठक्कर हा एक बरेच चिल्ले-पिल्ले बाळगणारा ट्रोलर मला ट्रोल करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी मीडिया मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या नरेश अरोरा यांनाही लक्ष्य केले. (Maharashtra Politics News)

भाजप आणि इतर काही ट्रोलर्स, मी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जे काही बोलत आहे, त्यावरुन मला वेड लागल्याचा प्रचार करणारे ट्रोल करत आहेत. होय मला अजितदादांवरील प्रेमापोटी वेड लागलंय. पण भाजप आणि इतर ट्रोलर्सना पैसे घेऊन काम करण्याचं वेड लागलंय. मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलं आहे. मला एकट्यालाच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला हे वेड लागले आहे. त्यामुळे माझं ट्रोलिंग सुरु आहे. काही कॅशबॉक्स वाले लोकही मला ट्रोल करत आहेत, त्यांचं नाव वेगळं आहे. पण तुला किती पैसा वापरायचा आहे तो वापर. आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणूस आहे.  या सगळ्या लोकांना मला एक सांगायचं आहे की, तुम्ही मला पाण्यात बघत आहात. पण माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. या महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी नागरिक माझ्यासोबत आहेत. हे लोक अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याचे काम करत आहेत. माझ्यासोबत समित ठक्कर याच्यासारखे पैशांसाठी काम करणारे चिरकूट ट्रोलर्स नाहीत. तर स्वाभिमानी लोक आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

Rohit Pawar:  VSR विमान कंपनीच्या मालकाचा मुलाचं मोदींच्या मंत्र्याशी कनेक्शन, सूनही घोटाळेबाज, मायामी बेटावर वास्तव्य: रोहित पवार

आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले. अजितदादांच्या विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर खूप दारु प्यायचा. तो तीन ते चार वर्षांसाठी निलंबित झाला होता. व्हीएसआरमध्ये तो कमी पगारावर काम करत होता. रोहित सिंह हा व्हीएसआरचा मालक विजय सिंग याचा मुलगा आहे. तो सध्या अमेरिकेतील मायामी येथे जाऊन राहत आहे. श्वेता सिंग ही रोहित सिंग याची पत्नी आहे. तीदेखील एका जेट कंपनीत होती. तिकडे रॅकेट चालवण्याच्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा. ते व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याच्या लग्नाला होते. त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. सध्या ज्या चुका समोर आल्या आहेत त्यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. मुळात हवाई उड्डाण मंत्री यांचाच व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी संबंध आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत जाऊन बसलाय. त्याला परदेशात जाण्याची परवानगी  कशी काय मिळाली?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

लेगेसी आणि लिएर जेट ही वेगवेगळ्या प्रकारची विमाने आहेत, ती चालवण्यासाठी वेगळा परवाना लागतो. तुम्ही यापैकी एक विमान चालवत असाल तर दुसरे विमान चालवू शकत नाही. मात्र, सुमित कपूर आणि रोहित सिंग हे दोघेही ही विमाने चालवत होते, याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. त्यामुळे आता व्हीएसआरकडून बनावट कागदपत्रं बनवण्याचे काम सुरु आहे. व्हीएसआरचा एक वैमानिक कॅप्टन कार्लोस हा व्हेनेझुएलाचा होता. तो भारतात येताना पॅसेंजर म्हणून यायचा. पण विमानात शिरल्यानंतर तो कॉकपीटमध्ये जाऊन विमान चालवायचा. व्हीएसआर कंपनीकडून अशा अनेक चुका लपवल्या गेल्या आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

आणखी वाचा

पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Embed widget