Rohit Pawar मुंबई: मी व्हीएसआर(VSR) किंवा डीजीसीए (DGCA) यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर आणि एरो या कंपन्यांना टारगेट मी करत नाही. मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे. शिवाय अजितदादांचा अपघात झाला तेंव्हा विमान हे वीएसआरचे होते आणि तपास यंत्रणा ही डीजीसीएची आहे. त्यांना वाचविण्यासाठी मोठ्या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्वनियोजीत दौरा नव्हता, आपणहेसातत्यानेम्हणतहोतो, तेही मान्य करण्यात आले आहे.
ॲाफिशियल एजच्या 3000 तास जास्तइंजिन चालले होते. आमची अपेक्षा होती की चुका होऊ नये. पण त्या झाल्या आहे. डोळ्याततेलघालूनलक्षघालणंगरजेचंहोतं. पूर्णमहिनातपासालाघेतला. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकलाय. एआयबी किती गंभीर आहे, हेयातूनदिसतअसल्याचेम्हणतआमदाररोहितपवारांनी डीजीसीएच्या तपासासंदर्भातगंभीरआरोप केलेआहे.
रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलंय, इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Rohit Pawar : गुंतवणुकदार आणि अधिकारी कोण-कोण आहेत?
अजित पवार जाऊन महिना झाला. अजित पवार यांच्या पक्षाने 15 दिवसांपूर्वी पत्र देऊन देखील अद्याप सीबीआय चौकशी होतं नाही. श्वेता सिंग, मनीष कुमार जॉइंट डायरेक्टर यांचं घर व्हिके सिंग यांनी बांधून दिलं आहे. टीडीबी चे पुन्हा दुसरा संबंध निघाला आहे. आद्राचा उद्योग मंत्र्यांचे थेट संबंध आहे. संजय पाठक भाजपचा खासदार आहे. त्यांची इन्वेस्टमेंच आहे. दिलीप बिल्डकॅानने गॅरंटी दिली ती कुणाच्या सांगण्यावरून गॅरंटी दिली? तर मग ते कोण व्यक्ती आहेत जे यांना वाचवत आहे. ज्युबली हिल्समध्ये कोण राहते, ते तुम्हाला माहिती आहे. मार्केट पेक्षा 17 कोटी रूपये जास्त देऊन ही प्रॅापर्चटी खरेदी केली गेली. त्यांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मागणी करून १२-१५ दिवस झाले तरी पुढे प्रकरण सीबीआयला देत नाही. मनन आणि समाफीटेल इन्व्हेस्टर आहे. ज्याला महाराष्ट्रातील एका मोठ्या पक्षाचे कार्यलय त्यांच्या नावे आहे. असेखळबळजनकआरोपहीरोहितपवारांनी केलेआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
