मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (शुक्रवारी, ता26) रात्री मुंबई ते नागपूर असा एकाच विमानाने प्रवास केला. ठाकरे हे त्यांचा पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार असून त्यासाठी ते इंडिगोच्या विमानाने नागपूरला गेले. आज त्यांचा दौरा सुरू होईल. याच विमानात मुख्यमंत्री फडणवीस  (Devendra Fadnavis)  होते. दोघांमध्ये चर्चा झाली नाही. फक्त एकमेकांचे कुशल दोघांनी विचारले. आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई आदी नेते हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत होते. (Devendra Fadnavis) या प्रवासावरची शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, एकतर ते कॉमन विमान होतं. प्रवास करत असताना आपण सहज जाऊन भेटत असतो, बोलत असतो. हा योगायोग आहे असं म्हणता येईल, दोन नेते एकाच विमानात असतील तर हरकत काय आहे आणि त्याच्या बरोबर पेट्रोल सुद्धा वाचले असं म्हणता येईल.

Rohit Pawar:  उद्धव ठाकरे जाऊन मांडवली करतील असे जर लोकांमध्ये चर्चा 

तर या प्रवासावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, आपण तिघे भेटलो हिच बातमी यावरती प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले,  तिघे लोक एकाच दिशेने प्रवास करत असेल तर ती बातमीच आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोनदा फोडला. आपलं घर, आपले खासदार, आपले आमदार, आपले कार्यकर्ते जर एखादा भाजपासारखा पक्ष फोडत असेल, तर आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असते. उद्धव ठाकरे स्वाभिमानी आहेत, कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. पण ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे जाऊन मांडवली करतील असे जर लोकांमध्ये चर्चा असेल तर ती हस्यास्पद आहे, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

Rohit Pawar:  ...तर या सगळ्या खासदारांची किंमत झिरो होणार 

या भेटीवर भाजप नेत्यांची सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, भाजपाने त्याबाबत सकारात्मकता दाखवली असेल तर ती अडचण उद्धव ठाकरेंची आहे असं मला वाटत नाही. ती अडचण एकनाथ शिंदे यांची आहे. हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारला पाहिजे. डी लिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी भाजपाला अजून 41 खासदारांची गरज आहे. त्याच्यामध्ये वीस खासदार टीएमसीचे आपण धरलेले आहेत, सहा खासदार उद्धव ठाकरे साहेबांचे धरले आहेत, अजून 41 खासदार त्यांना पाहिजे. या परिस्थितीत आज खासदाराची किंमत नक्कीच आहे, डी लिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी मात्र तो कायदा पास होईल असा आम्हाला वाटत नाही. तो कायदा चुकून पास झाला तर या सगळ्या खासदारांची किंमत झिरो होणार आहे. अमित शहा यांनी आम्हाला सांगितले दोन्ही कुबड्या आम्हाला नको, एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजित दादांचा पक्ष, 2029 च्या निवडणुकी अगोदर एकनाथ शिंदे आणि अजित दादांच्या पक्षाचे अनेक आमदार फुटून भाजपा जातील. आताचे प्रेम एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवले जाते ते फक्त डी लिमिटेशन कायदा पास करण्यासाठी आणि महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे, आता ही सगळी वेळ निघून गेला की या दोघांना सुद्धा भाजप डच्चू देईल, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar:  सहा खासदारांना निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा

उद्धव ठाकरेंचा सहा खासदारांच्या मतदारसंघात दौरा करत आहेत. त्यावरती बोलताना रोहित पवार म्हणाले की, शेवटी तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं तितकंच महत्त्वाचा आहे. त्या सहा खासदारांना निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता त्यांना पवार साहेबांनी खंबीरपणे साथ दिली. तिथं जर हे सहा लोक गद्दारी करत असतील तर ते कोणालाही आवडलं नाही, काल उद्धव ठाकरे नागपूरला पोहोचले तेव्हा हजारो लोक तिथे आले होते या सहा खासदारांचा निर्णय लोकांना आवडला नाही, असंही ते म्हणालेत.