Rohit Pawar : मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा; सिडको घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा घणाघात
Rohit Pawar on Sanjay Shirsat : नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली आहे.

Rohit Pawar मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar on Mahayuti Goverment) पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली आहे. नवी मुंबईतील सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागतायत ना, तर वन विभागानेच दिलेल्या कबुली पत्राचे हे घ्या आणखी पुरावे. आधी साडेबारा हजार पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवले आहेतच आणि आताही वनविभागाने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेले दोन पत्र सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत, हेही आपल्याकडे पाठवतो. असे म्हणत आमदार रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
तसंच या प्रकरणात याबाबत गुन्हा दाखल झाल्याचंही कळतंय. आता तरी 5 हजार कोटी रुपयांच्या या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा. आता एवढे पुरावे देऊनही आपण भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातलं तरी स्थानिक भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही हा लढा सोडणार नाही आणि हे प्रकरण तडीस लावल्याशिवाय थांबणार नाही! असा इशाराही आमदार रोहित पवारांनी सरकारला दिला आहे. या प्रकरणात लक्ष घातल्याने तब्बल सहा-साडेसहा हजार केटी रुपये सरकारचे आणि स्थानिक भुमीपुत्रांचे वाचवता आले, याचा आनंद आहे. आता याबाबत सरकार काय पावलं उचलतं, याकडं लोकांचं लक्ष लागून आहे. असेही ते म्हणाले.
Rohit Pawar on Sanjay Shirsat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकतर हे मान्य करा, नाहीतर.....
नवी मुंबईतील सिडको प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत वन विभागाने पोलिसांना पत्र देऊनही गुन्हा दाखल होत नसेल तर याचे क्लिअर कट दोनच अर्थ होतात. एकतर हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गृह विभागावर मित्र पक्षाचा प्रचंड दबाव आहे. नाहीतर या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ न देता मित्र पक्षावर उपकार करुन त्याला आपल्या ताटाखालचं मांजर बनवून ठेवायचं आणि चाणक्य नितीचा वापर करुन मित्र पक्षाचाच आमदार गळाला लावायचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकतर हे मान्य करा, नाहीतर मंत्री शिरसाठ यांचा राजीनामा घेऊन याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा. प्रश्न केवळ आपल्या एकट्याच्या इमेजचा नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इमेजचा आहे. असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या



















