एक्स्प्लोर

Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार, अजितदादांच्या मुलाचं प्रकरण बाहेर येताच रोहित पवारांचा मोठा दावा

Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन घोटाळे झालेले आहेत, असा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय.

Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडीया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केलाय. मुंबईची निवडणूक (BMC Election) संपली की भाजप एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.   

रोहित पवार म्हणाले की, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही. पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्याप्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे, भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे. 

Rohit Pawar on Devendra Fadnavis: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात सगळ्यात मोठे जमीन घोटाळे

भाजपाला कुबड्याची गरज संपलेली आहे, अमित शाह यांनी इथे येऊन सांगितलं की, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. कुठे ना कुठेतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. काहींची अपेक्षा होती, आदराने कुबड्यांना एखाद्या खोलीमध्ये टांगला जाईल, भिंतीला टांगला जाईल, पण इथे असं दिसतंय की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायचा भाजपचा प्रयत्न आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन घोटाळे झालेले आहेत, जर कोणी याला जबाबदार असतील तर ते मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय . 

Rohit Pawar on Eknath Shinde: मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार

रोहित पवार पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या निवडणुकीसाठी आहे. मुंबईची निवडणूक संपली की एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जाईल. त्यांना पूर्णपणे राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करू दिले जाणार नाही, अशी भूमिका भाजपची शंभर टक्के असणार आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: सुप्रियाताई सुरुवातीला भावनिक झाल्या, पण...

भाऊ, आत्या, आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका त्या व्यक्तीबद्दल घेऊ शकतो. पण एक राजकीय आमदार म्हणून राजकीय विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका व्यक्त करताना आपण सहसा बघतो आई असलेल्या महिला असतात, त्या थोड्या भावनिक असतात. त्या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळे यांना अचानक जेव्हा यावर विचारलं तेव्हा त्या भावनिक झाल्या. पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि शरद पवारांनी त्या ठिकाणी आपली राजकीय भूमिका व्यक्त केली. आम्ही शरद पवारांना म्हणणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही त्यांच्या विचाराने काम करणारे लोक आहे, असे देखील रोहित पवारांनी म्हटले आहे.

आणखी वाचा 

Ajit Pawar & Parth Pawar: 300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suvendu Adhikari PA : दोन कार, टोल प्लाझा अन् यूपीआय पेमेंट; शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस कसे पोहोचले?
दोन कार, टोल प्लाझा अन् यूपीआय पेमेंट; शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस कसे पोहोचले?
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Baba Siddique Death Case : बाबा सिद्दिकी मृत्यू प्रकरण, 18 महिन्यानंतर पोलिसावर कारवाई; बेजबाबदारपणा अन् निष्काळजीपणाचा ठेवला ठपका, नेमकं कारण काय?
बाबा सिद्दिकी मृत्यू प्रकरण, 18 महिन्यानंतर पोलिसावर कारवाई; बेजबाबदारपणा अन् निष्काळजीपणाचा ठेवला ठपका, नेमकं कारण काय?
Somnath Amrit Mahotsav: पंतप्रधान मोदींची सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थिती, मंदिरात विधिवत पूजा करत 11 तीर्थक्षेत्रांतील पाण्याने कुंभाभिषेक
पंतप्रधान मोदींची सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थिती, मंदिरात विधिवत पूजा करत 11 तीर्थक्षेत्रांतील पाण्याने कुंभाभिषेक

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
Embed widget