Rohit Pawar : महादेव मुंडे (Mahadev Munde) कोणत्या समाजाचे होते? ते ओबीसी समाजाचे होते. अनेक महिने त्यांची पत्नी न्याय मागत होती, मात्र न्याय मिळाला नाही. ते हिंदू नव्हते का? संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळाला नाही. स्थानिक लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा सरकारला जाग आली. संतोष देशमुख हिंदू नाही का?  असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, भाजपचे लोक समाजाच्या जाती-जातीमध्ये संघर्षाची बी पेरत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय. नागपूर (Nagpur News) येथे आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.

रोहित पवार म्हणाले की,  मुंबईमधील मनपा निवडणूक लक्षात घेऊन मराठी विरुद्ध बिगर मराठी वाद निर्माण केला आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला गेला. इतर राज्यांमध्येही विविध जातींमध्ये असे वाद निर्माण करण्यात आले आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तेव्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्येही जाती आणि धर्म पाहणार का?  शेतकरी आत्महत्त्येमध्येही धर्म आणि जात पाहिजे का? भाजपचे लोक समाजाच्या जाती-जातीमध्ये संघर्षाची बी पेरत आहे. त्या विरोधात आपल्याला लढावा लागणार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

महादेव मुंडे, संतोष देशमुख हिंदू नव्हते का?

महादेव मुंडे यांची हत्या झाली. महादेव मुंडे कोणत्या समाजाचे होते? ते ओबीसी समाजाचे होते. अनेक महिने त्यांची पत्नी न्याय मागत होती, मात्र न्याय मिळाला नाही. जेव्हा सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा मुख्यमंत्र्यांना 18 महिन्यानंतर जाग आली. महादेव मुंडे ओबीसी नव्हता का? ते हिंदू नव्हते का? संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही. स्थानिक लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा सरकारला जाग आली. संतोष देशमुख हिंदू नव्हते का?  असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  

रोहित पवारांचे लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य

तसेच लाडकी बहीण योजनेबाबत देखील रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 24 लाख महिलांचे नाव कापले गेले आहे. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत हे वाट पाहणार आहेत. त्यानंतर कदाचित योजना बंद केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरही रोहित पवारांनी भाष्य केले आहे. विनयभंग, बलात्काराचे सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात होत आहेत. महिला आयोग, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण हे सर्वात पहिले शरद पवार यांनीच आणले आहे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis on Sharad Pawar: रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक.... फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर