पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांच्यासह तरूणांनी तब्बल एक महिना हे आंदोलन केलं. आंदोलनआधिक तीव्र झाल्यानंतर अखेर त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजीत दिपके  (Abhijit Dipke) हे त्यांच्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर येथे परतले, त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान त्यानंतर शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन दिपके यांची भेट घेतली. मात्र या भेटीवरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. (Abhijit Dipke)

Continues below advertisement

Rohit Pawar: कितीही प्रयत्न केला, तर ते त्या...

"अभिजीत दीपके यांची, बच्चू कडू यांनी भेट घेतली, संजय शिरसाट यांनी भेट घेतली, त्यावरून आता महायुतीत थेट नाराजी झालेली आहे, याच्यावरती काय सांगाल? यावरती रोहित पवारांनी म्हटलं की, आता खरंच ते स्वतःच्या डोक्याने तिथे गेले होते, का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजी व्यक्त केली, हे आपल्याला तिथे सांगता येणार नाही, पण राहिला प्रश्न अभिजीत दीपके यांचा... तर ते ना महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये, ना भाजपमध्ये जाणार आहेत, त्यामुळे काहीही, कितीही प्रयत्न केला, तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथे काम करतील असं मला तरी वाटत नाही, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

तर काही वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात? अशी विचारणा आता एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांची भेट का घेतली असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी शिरसाट आणि बच्चू कडू यांना विचारल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  महायुतीची भूमिका ठरलेली नसताना अशाप्रकारे न विचारता अभिजीत दिपके यांची भेट घ्यायला नको होती असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement