एक्स्प्लोर

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक 'ओह शीट... ओह शीट' का बोलल्या? रोहित पवारांना कोणावर संशय?

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घातपाताची शंका बोलून दाखवली. भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, फडणवीसांची प्रतिक्रिया

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये मुख्य वैमानिक सुमित कपूर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले. या विमान अपघाताच्या काही क्षण आधी सहवैमानिक असलेल्या कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाची एक क्लिप समोर आली होती. यामध्ये त्या , 'ओह शीट... ओह शीट' बोलताना ऐकू येत आहे. त्यांना आता आपले विमान कोसळणार (Plane Crash) याचा अंदाज आल्यामुळेच त्या तसे बोलल्या असाव्यात, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. रोहित पवार यांनी बुधवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर प्रेझेंटेशन देताना काही शंका उपस्थित केल्या.

अजित पवार यांचे विमान ज्या गावात कोसळले तिथून नेहमी विमानं जातात. लोकांना विमानांचा आवाज परिचित आहे. गावातील लोकांचं म्हणणं आहे, अजित पवार यांच्या विमानातून वेगळा आवाज येत होता. त्यांचे विमानही खूप खाली होते. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असावा. कदाचित कोणीतरी विमानातील सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून विमान खाली आणले असावे. विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरु होते. पण स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद असावी. मात्र, विमान खूप खाली आल्यानंतर आता ते कोसळणार, याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. जो माणूस जीवाची पर्वा करतो, तशीच प्रतिक्रिया कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडून आली. त्यामुळे त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये 'ओह शीट... ओह शीट' बोलताना ऐकू येत आहे. यानंतर 9 ते 10 सेकंदात विमान खाली कोसळले. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा आक्षेप मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांचे विमान जे पायलट चालवणार होते, ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सुमित कपूर यांना आयत्यावेळी वैमानिक म्हणून पाठवण्यात आले. पण मुंबईत सकाळी साडेसहा वाजता ट्रॅफिक कुठे असते? कॅप्टन मदन यांच्या पत्नीने ट्विट केले आहे की, माझ्या पतीला काहीही झाले नाही, तुम्ही आम्हाला सांत्वनाचे मेसेज पाठवू नका. लोकांना वाटलं होतं, कॅप्टन मदन अजित पवार यांचे विमान चालवत आहेत. सुमित कपूर यांच्याविषयी कोणालाही माहिती नव्हते. त्यामुळे खरोखरच कॅप्टन मदन आणि त्यांचा क्रू ट्रॅफिकमध्ये अडकला होता का, यासाठी सीसीटीव्ही तपासले हवेत. या चौकशीचा वेग अत्यंत मंद आहे. कॅप्टन सुमीत कपूर यांना 2010  आणि 2017 साली दारु पिऊन विमान चालवल्याप्रकरणी परवाना रद्द करण्यात आला होता. ते विमान अपघाताच्या आदल्या दिवशी हाँगकाँगवरुन आल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी भाजपचा एक नेता विमानाने नांदेडला जात होता. त्यावेळी कपूर वैमानिक होते. तिकडेही ज्याप्रकारे लँडिग झाले होते, त्याची तक्रार संबंधित नेत्याने केली होती. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय, देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले रागाच्या भरात... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा

Embed widget