एक्स्प्लोर

Rohit Pawar On Ajit Pawar Accident : अजितदादांच्या विमानाचा स्फोट झाला पण कागद का जळले नाहीत?; रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये कागदपत्रं जळाली नाहीत. स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाला पण आग विझली. रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर 1100 डिग्री सेल्सिअस असताना, तिथे 1 तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. सहा हजार मीटर खोलीपर्यंत पाण्याचं जे प्रेशर असतं त्या प्रेशरवर ब्लॅक बॉक्स ठेवण्यात येतो. हे अतिरिक्त प्रेशर सांगितलं गेलंय. कितीतरी हत्ती त्यावर उभे केलेत तरी ते टिकू शकेल, इतका दबाव त्यात असतो. आगीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो ब्लास्ट झाला त्याबद्दल सांगायचं झालं तर, तिथं अनेक कागद न जळालेले आढळून आले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की हे कागद का जळाले नाहीत? मात्र हा स्फोट आणि त्याचा भपका का हा काही सेकंदाचा असतो. काही सेकंदात तो विझुनही जातो, त्यामुळे काही कागद तिथे जळालेले नाहीत. असा दावा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: कागदे जळाले नाहीत तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू

विमानाचा मेल्टिंग पॉईंट हा 635 अंश डिग्री सेल्सियस आहे. विमानाची ॲल्युमिनियम बॉडी ही 650 डिग्री सेल्सियसला वितळू शकतो. नंतरचा विमानाचा आतला भाग थर्मल इन्सुलेशनचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्या ॲल्युमिनियमपासून बनली आहे, त्याच्या आत हा भाग असतो आणि त्याच्या आतमध्ये हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे वारंवार जो दावा करण्यात येत आहेत ते सर्व मॅन्युफिलेशन करण्यात येत आहे. अकराशे अंशांनी एक तास जळाला तरच ब्लॅक बॉक्स निकामी होतो. कागदे जळाले नाहीत, तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू होतो, असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar  : ब्लॅक बॉक्स जळला हे केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठीच

रोहित पवार यांनी आज (बुधवारी) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले. अजितदादांच्या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये अपघातानंतर मोठे स्फोट झाल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतंय. विमान पडल्यानंतर काही वेळाच्या अंतराने स्फोट झाले होते. त्या विमानात अधिकचे इंधन होते. विमानाच्या पंखामध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते, यामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट झाले. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हा जो प्रचार सुरू होता, जे सांगण्यात येतंय ते केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठी आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. असेही रोहित पवार म्हणाले.

आणखी वाचा

अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget