एक्स्प्लोर

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये कागदपत्रं जळाली नाहीत. स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाला पण आग विझली. रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर (Captain Sumit Kapoor) याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.

मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. हे विमान बारामतीवरुन हैदराबादला जाणार होते. तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आले असते. मात्र, हे विमान सुरतवरुन मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या. या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप रोहित पवार यांनी केला. 

विमानाच्या लँडिगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते. मात्र, बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती. मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती. तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे. त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Rohit Pawar on VSR flight company: व्हीएसआर कंपनीकडून पुराव्यांशी छेडछाड, कागदपत्रांमध्ये फेरफारीचे प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप

यावेळी रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणाऱ्या कंपनीवरही गंभीर आरोप केले. व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाच हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget