एक्स्प्लोर

अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा

अजित दादा जर गाडीने गेले असते तर दुर्देवी घटना घडली नसती. त्यामुळे, काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (rohit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार (Ajit pawar) यांच्या बारामती विमान दुर्घटनेवरुन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, अजित दादांचा मृत्यू हे अपघाती निधन असण्यापेक्षा घातपात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला असून याची चौकशी राष्ट्रीयस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर, दिल्लीतही रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अपघाताच्या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, शेकडो कोटींच्या कंत्राटावरुन वाद विवाद झाल्याने उशीर झाल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. तसेच, बारामतीतही नरेश अरोरा यांच्या लोकांना दादांनी झापल्याचंही त्यांनी सांगितलं.  

अजित दादा जर गाडीने गेले असते तर दुर्देवी घटना घडली नसती. त्यामुळे, काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत. फाईल मुद्दामहून आणली गेली का? दादांनी फाईलवर सही केली, त्यानंतर 7.13 वाजता विमानांचे बुकींग झाले. मी कोणावरही प्रश्न उपस्थित केले नाहीत, पण याचा तपास व्हावा, जे खरं आहे मी तिथे बोललो, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. 

27 तारखेला तटकरे म्हणताहेत की मी तिथे आलो उशीरपर्यंत थांबलो, एखाद्या पॅालिटिकल कन्सल्टंटची तिथे चर्चा झाली. दादाकडून त्या व्यक्तीचे शेकडो कोटीचे कंत्राट रद्द केले जाणार होते, त्यावरून वाद विवाद झाला म्हणून उशीर झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. आम्ही पुण्यात बारामती हॅास्टेलला बसलो होतो, तेंव्हा नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापले होते. नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला तेवढे पैसे द्यायला पाहीजे होते, असा काही नेत्यांचा आग्रह होता. कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे, असे म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटवरुन सुनिल तटकरेंकडे कंत्राटवरुन बोट दाखवले आहे. 

दिल्लीता जाऊन मोदी-शाहांना भेटता आले नाही 

सत्तेत नसतानाही अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, मला वेळ मिळाली नाही. परंतु, ई-मेलच्या माध्यमातून पत्र लिहणार आहे. विरोधात असतानाही आम्ही लढतोय, पण जे सत्तेत आहेत ते बोलत नाही. संसद सुरू अससल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, विमान उड्डाणमंत्री यांनी वेळ दिला नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले. मोदी आणि अमित शाह यांना काकी भेटल्या, पार्थ जय होते. मी अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून जो काही अपघात झालाय तो घातपात होता की अपघात होता हाच मुद्दा मांडला असावा. तपास यासाठी व्हायला पाहिजे की ब्लॅक बॅाक्समध्ये काहीच मिळालं नाही. रेकॅार्डींग काहीच मिळालं नाही, अशी फालतू कारणं महाराष्ट्र ऐकणार नाही. अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, याकडे नेत्यांचे लक्ष नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही रोहित पवार यांनी म्हटले. यात क्रिमिनल इन्वेस्टीगेशन व्हायला पाहीजे, पारदर्शक पद्धतीने तपास व्हायला पाहीजे. ब्लॅक बॅाक्स बंद करता येत नाही. पण, काहीजण म्हणत असतील की ब्लॅकबॅाक्स बंद आहे, तर मी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले असं होईल, असे म्हणत रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. डीजीसीएनं तपास सुरू केला आहे, परंतु एका महिन्यांत इंटरनॅशनल एजन्सीद्वारे तपास व्हावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. 

हेही वाचा

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget