Rohit Pawar on Ajit Pawar plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी व्हीएसआर (VSR Flight) कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. रोहित पवार (Rohit Pawar) हे व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. यानंतर आता त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि महाराष्ट्रातील एका नेत्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदांमधून व्हीएसआर कंपनीची विमानं ही सदोष असून त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली होती. तरीदेखील महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.  (Maharashtra Politics News)

Continues below advertisement

Rohit Pawar: रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो, प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो, त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो, त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो, विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का?

Continues below advertisement

माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका. व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका. आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या.. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. 

महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ / दलाल म्हणून काम करत होता त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ /दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआय कडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा!

आणखी वाचा

व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप