Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोरआलीआहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद दाखल करण्याच्या तयारीतअसल्याचीमाहितीसमोरआलीआहे. विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीवर तत्काळ कारवाई करण अपेक्षित असताना कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने गुन्हा नोंद दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
Rohit Pawar Amol Mitkari : डीजीसीएविरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. हा अपघात आहे की घात आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरदुसरीकडेराष्ट्रवादीशरदपवारगटाचेआमदाररोहितपवारांनी सत्यत्यानेयाप्रकाणावरभाष्यकरत डीजीसीए आणि व्हिएसआर (VSR) कंपनीवरगंभीरआरोपकेलेआहेत. तरदुसरीकडेआमदारअमोलमिटकरीहेदेखीलरोहितपवारांच्याभूमिकेशीसहमतअसूनत्यांनीहीयाप्रकरणाच्यासखोलचौकशीचीमागणीलावूनधरलीआहे. याचपार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघाताचा छडा लावण्यासाठी आमदार रोहित पवार आणिआमदार अमोल मिटकरी एकत्र डीजीसीएविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचेसमोरआलंआहे.
Rohit Pawar : दबाव वाढल्यानंतर आता चौकशी होऊ लागलीय, पुन्हापत्रकारपरिषदघेणार
दरम्यान, 28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली ज्यात महाराष्ट्राचे मोठे नेते अपघातात गेले. त्या दिवसानंतर आत्तापर्यंत सामान्य लोकांना असं वाटत आहे की दादा आज ना उद्या परत येतील. परंतु आम्हाला माहिती आहे की ते परत येणार नाहीत. आमची भूमिका आहे अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे अशीआहे. कुणी सोशल मीडियावर बोलत आहे, तर कुणी टपरीवर बोलत आहे, अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे. काहींजण सोशल मीडियावर बोलत आहेत. आमदार अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यासह सर्वजण लढत आहेत. हा लढत असताना प्रेशर निर्माण झालं आहे. ताकद निर्माण झाली आहे, त्यातून लक्षात आलं आहे की, तपासावर आम्ही संशय उत्पन केल्यावरआणि तपासासाठी दबाव वाढल्यानंतर आता चौकशी होऊ लागली आहे. ज्या दिशेने तपास जायला पाहिजे तिकडे जाऊ लागलाय. पण दोन दिवसांनी आणखी एक पत्रकारपरिषद घेणार आहे. अशीमाहितीआमदाररोहितपवारयांनीदिलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
