एक्स्प्लोर

Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!

Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार, कोणीही भेट देऊ नये, असे फर्मान शिवसेना शिंदे गटाने काढले असल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे.

Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: शिंदेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar MPSC Protest Pune) सहभागी असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला (MPSC Protest Pune) भेट देऊन पाठींबा दिला. ओमराजे निंबाळकर येताच काही विद्यार्थ्यांनी ओमराजेंची हुर्रे उडवली. अनेक विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचे समोर आले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी एक खळबळनजक दावा केला आहे. 

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार, कोणीही भेट देऊ नये, असे फर्मान शिवसेना शिंदे गटाने काढले असल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या. पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी हा मेसेज सर्वत्र पाठवल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगितले. (Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest)

रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या? (Rohini Khadse On Eknath Shinde)

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. समाजातील विविध घटक व लोकप्रतिनिधी या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार, कोणीही भेट देऊ नये असं अजब फर्मान शिंदेंच्या शिवसेनेने काढले असल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे. 

विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत- रोहिणी खडसे (Rohini Khadse On MPSC Protest)

रोहिणी खडसे याबाबत म्हणाल्या की, तिथे विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. अनेक जण उपाशीतापाशी आहेत, रात्रीची झोप विद्यार्थ्यांना माहिती नाही, प्रचंड संघर्ष करत आपल्या मागण्या सांगत आहेत आणि राज्यातील एक सत्ताधारी पक्ष अशाप्रकारे मंत्री, आमदार, खासदार यांना मेसेज देतो. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, हे काही बरोबर नाही. किमान आपल्या सारख्या संवेदनशील नेत्याच्या पक्षाकडून असे होणे अपेक्षित नव्हते, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.

ओमराजे आंदोलनस्थळी येताच गोंधळ- (Omraje Nimbalkar MPSC Protest Pune)

विद्यार्थ्यांचा विरोध आणि घोषणाबाजी पाहता विवेकानंद पाटीलने सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ओमराजे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आहेत. त्यांची वैयक्तीक राजकीय भुमिका काहीही असो ते आपल्याला पाठींबा देण्यास आले आहेत. आपण त्यांचा मान राखला पाहिजे, असं विवेकानंद पाटील याने सांगितले. सरकारने आधीच आपल्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आंदोलनाला गालबोट लागेल असं काहीही करु नका, सरकारला हेच हवं आहे, असं विवेकानंद पाटील म्हणाला. त्याचप्रमाणे ओमराजेंना पुढील नियोजित दौरा आहे. त्यामुळे त्यांना आता आंदोलनास्थळापासून बाहेर जाण्यासाठी मार्ग मोकळा करा. ओमराजेंना कुठलाही त्रास होता कामा नये. ओमराजे तुम्हाला राग आला असेल तर माफ करा...असं विवेकानंद पाटील म्हणाला. यानंतर ओमराजेंनी लगेच हातात माईक घेऊन..अरे ज्याला आपले मानतात...त्याने आपलेपणाही जपला पाहिजे...असं म्हणत कोणताच राग आला नसल्याचं ओमराजेंनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांकडून एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र या गोंधळामुळे ओमराजेंना भाषण मात्र उरकतं घ्यावं लागलं. तसेच मोठ्या पोलिस बंदोबस्तात ओमराजेंना बाहेर काढण्यात आलं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Omraje Nimbalkar MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच गोंधळ, भाषणाला विरोध; मग ओमराजेंच्या एका वाक्याने टाळ्यांचा कडकडाट

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
राज्यात दुष्काळी परिस्थिती! मॅरेथॉनसाठी 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेरकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल 
राज्यात दुष्काळी परिस्थिती! मॅरेथॉनसाठी 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेरकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल 
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget