एक्स्प्लोर

Ritu Tawde BMC Mayor: अतिरिक्त पाणी, पार्किंगची निर्मिती, फेरीवाल्यांसाठी हॉकिंग झोन...; महापौरपदाचा पदभार स्वीकारताच रितू तावडेंनी पुढचा प्लॅन सांगितला!

Ritu Tawde BMC Mayor: मुंबईच्या महापौर म्हणून तावडे आणि उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची बुधवारी पालिका सभागृहात निवड करण्यात आली.

Ritu Tawde BMC Mayor: दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील दरवाढीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. त्यासाठी दरवर्षीच्या 8 टक्के दरवाढीला स्थगिती देऊन, हे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच टैंकर माफियांची मक्तेदारी मोडण्यासाठी 'टँकर माफिया फ्री मुंबई' हे धोरण राबविण्यात येईल, अशी घोषणा नवनिर्वाचित महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी केली. महायुतीच्या 'विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई' या वचनाशी कटिबद्ध राहू, असे आश्वासनही रितू तावडे यांनी दिले.

मुंबईच्या महापौर म्हणून रितू तावडे आणि उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची बुधवारी पालिका सभागृहात निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त झालेले पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही निवड जाहीर केली. विरोधी पक्षांकडून कोणीचाही अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध झाली. महापौर रितू तावडे यांनी भाषणात पाणीपुरवठा, अग्निशमन दल, सार्वजनिक शौचालय, पार्किंग, पाणीपुरवठा प्रकल्प, वैद्यकीय सुविधा, मुंबईत निर्माण होणारी पूरस्थिती, महापालिका शाळांचा दर्जा, गावठाणांचा विकास, पर्यावरणीय आराखडा, खड्डे अशा विविध मुद्यांचा उल्लेख केला. पदभार स्वीकारल्यानंतर तावडे यांनी सहा पानी भाषणात आपले 'व्हिजन' मांडले. (Ritu Tawde BMC Mayor)

अतिरिक्त पाणी देणार- (Water Supply BMC)

पाणीपुरवठा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक विभागात पाणी गळती शोधणारी यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील. समान पाणी वितरणासाठी फ्लो मीटर बसवण्यात येतील. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयके तसेच मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाईल. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उपाययोजना करण्याचे धोरण आहे.

प्रशासक ते पीठासन अधिकारी; गगराणी यांची कुशल कामगिरी-

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निवृत्तीला ४० दिवस बाकी आहेत. माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून २० मार्च २०२४ रोजी त्यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला. प्रशासक म्हणून काम करताना अनेक मोठे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. आज पीठासन अधिकारी या नात्याने त्यांनीच महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली. पीठासन अधिकारी म्हणून काम करताना सभागृहात घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना शिस्त लावण्याचे कामही त्यांनी कटुता येऊ न देता पार पाडले. प्रशासक म्हणून त्यांची 3 कारकीर्द आता संपणार असली तरी, आता ते थेट महापालिका आयुक्त म्हणून पुढील ४० दिवस काम पाहणार आहेत. या कालावधीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील मुख्य दुवा म्हणून त्यांना जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

महापौर निधीत वाढ- (Ritu Tawde BMC Mayor)

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येतील. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेली मूल्ये शाळांमध्ये शिकवले जातील.

खड्यांसाठी उपाय- (Mumbai Road Transport)

सतत पडणाऱ्या खड्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईमध्ये युटिलिटी टनेल बनवण्यात येतील. तसेच नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी आणि नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते करण्यात येतील. पादचारी स्नेही पदपथ विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटपासून केले जातील. पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी भुयारी व जमिनीवरील पार्किंगची निर्मिती करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

फेरीवाल्यांसाठी हॉकिंग झोन- (Mumbai Hawking zone)

मुंबईमध्ये सर्व पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन करण्यात येईल आणि हॉकिंग झोन्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रे नॉन हॉकिंग झोन्स म्हणून घोषित करण्यात येतील. तसेच, सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना त्वरित 'विक्रेता प्रमाणपत्र' आणि ओळखपत्र देण्यात येईल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्याबाबच्या चौकशीचीही केली मागणी
अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्याबाबच्या चौकशीचीही केली मागणी
Rohit Pawar: 'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Embed widget