Ravindra Phatak on Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यातील चांगलच वातावरण गरम झालं आहे. 16 दिवसापासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांचे उपोषण सुरु आहे. अशातच आता 19 तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रविंद्र फाटक (Ravindra Phatak)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या माध्यमातून जरांगे साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या नक्कीच 99 टक्के मान्य झाल्या आहेत, असं मला वाटतं असल्याचे फाटक म्हणाले. ते मुंबईत आले त्यांचे स्वागतच असल्याचे फाटक म्हणाले. 

Continues below advertisement

Manoj Jarange Patil :  जरांगे पाटील येत्या 19 सप्टेंबरपासून ते मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 16 दिवसापासून उपोषण करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण माघारी घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी मुंबईत जाण्याची घोषणा देखील केली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून ते मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. मराठा बांधवांना त्यांनी मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार रविंद्र फाटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या माध्यमातून जरांगे साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या नक्कीच 99 टक्के मान्य झाल्या आहेत, असं मला वाटतं असे फाटक म्हणाले.

मुंबईतील 19 सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या मुंबईतील 19 सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी 19 तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार होते. त्या संदर्भात हमीपत्र देखील मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांना दिलं होत. मात्र पोलिसांनी आझाद मैदान पोलिसानी गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देत परवानगी नाकारली आहे. मागच्या आंदोलनाचा दाखला देत आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. परवानगी नाकारल्यानंतर आता मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, आम्ही संविधानाप्रमाणे चालतो.सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधील नाही. सरकारचे नियम आम्ही मानत नाही. द्वेष भावनेने परवानगी नाकारली आहे. मुंबईत आंदोलन जरांगे करू शकतात असं न्यायालय म्हणत असताना यातून द्वेष उफाळून येत आहे, गेल्यावर्षी देखील गणेशोत्सव होता. तरीही आम्ही शांततेत आंदोलन केलं. मिरवणूक गणेशोत्सवाची देखील होईल, ठरल्याप्रमाणे आम्ही उपोषण करू. आमचे वकील आजपासून कामाला लागतील, असंही पुढे जरांगेंनी म्हटलं आहे.

Continues below advertisement