Ratnagiri ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार आणि कोण शिकस्त खाणार याचा फैसला (Maharashtra Elections 2026)  आज होईल. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Continues below advertisement

12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीची विजयी घोडदौड कायम राहणार की माविआ कमबँक करणार हे आज स्पष्ट होणार आहे. (Ratnagiri ZP Election Result 2026)

रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूकीचाही आज निकाल- (Ratnagiri ZP Election Result 2026)

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 55.79 टक्के मतदान झाले. रत्नागिरीतून शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Continues below advertisement

महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी- (Mahayuti Winning Candidate List ZP Election Result 2026)

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग(8 बिनविरोध )१) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप)२)बांदा; प्रमोद कामत (भाजप)३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप)६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप)७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती कणकवली(6 बिनविरोध)१)वरवडे ; सोनू सावंत (भाजपा)२)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)

देवगड तालुक्यातील पंचायत समिती(6 बिनविरोध)१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)४) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)५) शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप)६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप) पंचायत समिती वैभववाडी(1 बिनविरोध)१) कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)पंचायत समिती वेंगुर्ले (1 बिनविरोध)१)आसोली; संकेत धुरी (भाजप) मालवण पंचायत समिती (1 बिनविरोध)१)अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप) सावंतवाडी पंचायत समिती (1 बिनविरोध)१)शेरले; महेश धुरी (भाजप) दोडामार्ग पंचायत समिती (1 बिनविरोध)१)कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

संबंधित बातमी:

Maharashtra ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?