एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Ratnagiri news: रत्नागिरीतील उबाठाचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर, उदय सामंतांच्या गौप्यस्फोटाने ठाकरेंच्या गोटात खळबळ

Ratnagiri news: रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय.

Ratnagiri news: विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एका मागे एक धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) 'जय महाराष्ट्र' करत महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. आता रत्नागिरीच्या (Ratnagiri) राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शिवसेना ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. उदय सामंतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या गोटात मोठ्या खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Ratnagiri news: ठाकरे गटाचे उमेदवार भाजपच्या वाटेवर?

उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्यकामार्फत भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत," असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

इतकंच नव्हे, तर सामंतांनी आणखी धक्कादायक माहिती देताना सांगितले की, “पक्षप्रवेश करत असताना माझा अडथळा कुठे येऊ नये, यासाठी मला देखील निरोप पाठवले गेले आहेत," असे देखील उदय सामंतांनी म्हटले आहे. उदय सामंतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

Uday Samant on Local Body Election: आगामी निवडणुकांबाबत सामंतांची भूमिका स्पष्ट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, “महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

उदय सामंत पुढे म्हणाले की, स्थानिक पातळीवर काही हेवेदावे असतील. त्यावरती देखील तोडगा काढण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार तिन्ही नेत्यांना आहे. या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा देऊ शकत नाही. निवडणुका लढवताना सर्व विचार केला जाईल. त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  

Uday Samant on Raj Thackeray Uddhav Thackeray: उदय सामंतांचा ठाकरे बंधूंवर निशाणा 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात गाठीभेटी वाढल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. "जे वीस वर्ष एकत्र नव्हते ते आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत," अशी टीका त्यांनी ठाकरे बंधूंवर केली आहे. आता उदय सामंतांच्या वक्तव्यावर मनसे आणि ठाकरे गट काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

आणखी वाचा 

Solapur BJP News: कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध, सोलापुरात दिलीप मानेंच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये वाद उफाळला, भाजपचे कार्यकर्तेच पक्ष कार्यालयावर धडकणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत
Congress On Bihar Vote Chori : काँग्रेस बिहारमधील व्होटर्स डेटा चेक करणार - सूत्र
Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
Embed widget