Ramdas Kadam Wife: रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांसमोर; अनिल परबांचे आरोप फेटाळले, सांगितला जळालेल्या दिवशीचा थरारक प्रसंग
Ramdas Kadam Wife: मला वाचवण्यासाठी बाहेर देशात ट्रीटमेंटला नेले होते, हे फार चुकीचे आरोप आहेत, आम्हाला बदनाम करू नका, आम्हाला त्रास होतो आहे, मी पहिल्यांदा मी मिडियासमोर आले आहे, असंही त्या म्हणाल्यात.

मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या वाद-प्रतिवाद सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल (शनिवारी, ता ४) आरोप की, १९९३ साली रामदास कदम (Ramdas Kadam) यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम राज्याचा गृह राज्यमंत्री आहे. त्यामुळे त्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. कदम यांच्या घरात १९९३ साली काय झाले होते, हे शोधण्यासाठी कदम (Ramdas Kadam) यांची नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी परब यांनी केली.कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळण्यात आले होते? यासाठी नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत कदम यांनी केलेला दावा धादांत खोटा ,असेही अनिल परब म्हणाले. त्या आरोपांवरती आज रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या पत्नीने स्पष्टीकरण दिले आहे.
Ramdas Kadam Wife: काय म्हणाल्या ज्योती कदम?
रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हणाल्या की, काल जे आरोप केले ते खोटे आहेत. काल त्यांनी जे आरोप केले ते फार चुकीचे आहेत, तेव्हा असे काही झाले नव्हते, तेव्हा आम्ही इतके श्रीमंत नव्हतो की, आमच्याकडे गॅस सिलेंडर असावा, मी स्टोव्हवरती स्वयंपाक करत होते, मी स्वयंपाक करत होते तेव्हात स्टोव्हने आधी माझा पदर जळला, त्यानंतर ही घटना घडली होती. मला वाचवताना त्याचे हात देखील भाजले होते, मला त्यांनी रूग्णालयात नेलं, मला वाचवण्यासाठी बाहेर देशात ट्रीटमेंटला नेले होते, हे फार चुकीचे आरोप आहेत, आम्हाला बदनाम करू नका, आम्हाला त्रास होतो आहे, मी पहिल्यांदा मी मिडियासमोर आले आहे, असंही त्या म्हणाल्यात.
Ramdas Kadam: त्या घटनेबाबत रामदास कदमांनी काय म्हटलं होतं?
अनिल परब यांनी आरोप केल्याच्या नंतर रामदास कदम यांनी उत्तर दिलं होतं, खेडच्या घरात आग कशी लागली? याची त्यांनी माहिती दिली.कदम म्हणाले, खेडच्या घरात दोन स्टोव्ह होते. तेव्हा स्टोव्हवर जेवण बनवायचो. जेवण बनत असताना माझ्या पत्नीच्या साडीला आग लागली. त्यावेळी मीच पत्नीला वाचवले. पत्नीला वाचवत असताना माझे हात भाजले. कदम पुढे म्हणाले की, पत्नी भाजल्यानंतर पुढील सहा महिने तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. मीदेखील पत्नीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात होतो. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती, अशी माहिती देखील त्यांनी दिली होती.


















