Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदमांचा थेट इशारा
Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब तू का बोलतो? उद्धव ठाकरे का बोलत नाही? असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केलाय.

Ramdas Kadam on Anil Parab : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले. या आरोपांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा आहे. बाळासाहेब यांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात, कुठली बॉडी दोन दिवस ठेवता येते का? कुठलाही मृतदेह दोन दिवस शेवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे का? असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लबोल केला. आता रामदास कदम यांनी अनिल परब यांना थेट इशारा दिला आहे.
रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली. काल जेव्हा अनिल परबची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी ती पाहिली नव्हती. त्यांनी नीच शब्द वापरले. बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव 2 दिवस मातोश्रीमध्ये ठेवले होते. यावर उद्धव ठाकरे बोलायला पाहिजे होते. पण या भाXXXXने उत्तर दिलं. याच्यामुळेच हा पक्ष फुटला आहे. माझावर आरोप केला की, तो डान्सबार आहे. पण,तिथे ऑर्केस्ट्रा होता. उद्धव ठाकरे पण दोन वेळेस बोलेले आहेत. म्हणून मी कोर्टात जाणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Ramdas Kadam on Anil Parab : बिल्डरकडून अनिल परबने 2 गाड्या घेतल्या
रामदास कदम पुढे म्हणाले की, विलेपार्ले प्रेमनगरमध्ये SRA योजनेत अनिल परबने 8 हजार मराठी माणसांना शाखेत दम देऊन घरं खाली करून घेतले. फक्त 1 वर्षाचे भाडे दिले. संजय कदम आणि अनिल परब अनेक कोटी रुपये कमावले. बिल्डरकडून अनिल परबने 2 गाड्या घेतल्या, असा आरोप त्यांनी अनिल परब यांच्यावर केला.
Ramdas Kadam on Anil Parab : उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला
मातोश्रीमध्ये डॉक्टरांची टीम होती ही माहिती खोटी आहे. अनिल परब भाXXX आहेत. उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी अनिल परब खोटे बोलले. लोकांच्या समोर बाळासाहेब गेले हे मी जाहीर केले होते. जर डॉक्टरांची टीम होती तर त्यांचे नाव सांगा? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. तर अनिल परब तू का बोलतो? उद्धव ठाकरे का बोलत नाही? असा सवाल देखील रामदास कदमांनी उपस्थित केला.
Ramdas Kadam on Anil Parab : अमित शाहांकडे चौकशीची मागणी करणार
अनिल परबकडे किती बोगस कंपन्या आहेत. यासंदर्भात माझ्याकडे यादी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा देखील रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिला.
आणखी वाचा



















