Ramdas Athawale on Bakri Eid: मुस्लीम धर्मियांच्या बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राजकारण तापले आहे. यंदा भाजपकडून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी बकऱ्यांची कुर्बानी देण्यास प्रचंड विरोध केला आहे. त्यामुळे मिरारोड, घाटकोपर, गोरेगाव परिसरात बकरी ईदच्या कुर्बानीसाठी (Kurbani) आणलेले बकरे तरत्र हलवण्यात आले होते. तसेच आज बकरी ईदच्या (Bakri Eid) दिवशी कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्री असलेल्या रिपाई प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. भारतीय संविधानाने सगळ्या धर्मांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणीही धार्मिक भावना भडकवू नये, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. ते बुधवारी पालघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Bakri Eid 2026)

Continues below advertisement

यावेळी रामदास आठवले यांना बकरी ईदच्या कुर्बानीवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, मुघल भारतात आल्यानंतर येतील हिंदू मुस्लीम झाले. त्यामुळे मुस्लीम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपली अवलाद आहेत. भारतात आधी सगळे हिंदूच होते. अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक होते. त्यामुळे आता कोणीही धार्मिक भावना भडकवू नयेत. अशा पद्धतीने कोणालाही विरोध करु नये, मग ते भाजपचे लोक असू देत किंवा इतर कोणी. भारतीय संविधानाला छेद देणारं काही होऊ नये. भारतामधील संविधान सर्वांसाठी आहे. कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचता कामा नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी हे वक्तव्य करुन बकरी ईदच्या कुर्बानीवरुन इरेला पेटलेल्या भाजपला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे यावर भाजप काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल. 

Mira Road News: मिरारोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

Continues below advertisement

मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर 1 म्पलेक्समधील सोसायटीत कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी पूनम इस्टेट क्लस्टर 3 परिसरातील पाच ते सात बकऱ्या पोलीसांच्या बंदोबस्तात पालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी हलवण्यात आल्या. शिमीरा पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच परिसरातील वातावरण शांत राहावे, यासाठी बकऱ्यांना टेम्पोमधून हलवण्यात आले. यावेळी परिसरात पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तसेच शेजारच्या कॉम्पलेक्समध्ये यापूर्वी झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली आहे. आज बकरी ईद असल्याने संपूर्ण मिरा भाईंदर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सुमारे 525 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा

Bakri Eid Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं