Ramdas Athawale On Raj Thackeray: गुजराती असो वा मराठी, प्रत्येकजण मुंबईकर, राज ठाकरे संकुचित...; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
Ramdas Athawale On Raj Thackeray: मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उभं राहून विकास होणार असेल तर मी खपवून घेणार नाही, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे.

Ramdas Athawale On Raj Thackeray मुंबई: महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी हे सगळं सुरू आहे. ज्यावेळी गुजरातचा वरवंटा या महाराष्ट्रावर फिरेल त्यावेळी भाजपला मतदान करणारा मराठी माणूसही त्यात भरडला जाईल, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उभं राहून विकास होणार असेल तर मी खपवून घेणार नाही, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी निशाणा साधला आहे.
रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? (Ramdas Athawale On Raj Thackeray)
आज राज ठाकरे जे करत आहेत त्यावरून मुंबईच्या इतिहासाची आणि तिच्या खोल ओळखीची कमतरता दिसून येते. आपण हे विसरू नये की मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, परंतु गुजरातशी त्याचा एक मजबूत ऐतिहासिक संबंध देखील आहे. शतकानुशतके, गुजराती आणि मराठी समुदायांनी एकत्रितपणे मुंबई बांधली आहे, ती आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केली आहे. मुंबई हे शहर केवळ महाराष्ट्राचा अभिमान नाही, तर त्याचा एक भाग गुजरातशी देखील जवळून जोडलेला आहे. आज राज ठाकरे जे करत आहेत ते संकुचित आणि फुटीर राजकारण आहे जे मुंबईच्या आत्म्याला दुखावत आहे.
बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेसाठी लढले, परंतु त्यांनी कधीही शहराकडे संकुचित दृष्टीने पाहिले नाही. येथे, गुजराती असो वा मराठी, प्रत्येकजण मुंबईकर आहे. राज ठाकरेंना भाषणं देण्याची कला आहे आणि व्यंग्यात्मक भाष्य करण्याची कला आहे, परंतु यातून कोणतेही ठोस किंवा रचनात्मक परिणाम मिळालेले नाहीत. जर त्यांना खरोखर महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही करायचे असेल तर त्यांनी आंबेडकरी चळवळ, बहुजन विकास आणि शैक्षणिक सुधारणा यासारख्या गंभीर मुद्द्यांवर काम केले पाहिजे. महाराष्ट्राचे नेतृत्व केवळ मोठ्याने केलेल्या विधानांनी आणि वादग्रस्त भाषणांनी करता येणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
राज ठाकरे जो आज भी कर रहे हैं, वह मुंबई के इतिहास और उसकी पहचान की गहराई को न समझने जैसा है। हमें यह नहीं भूलना चाहिए कि मुंबई महाराष्ट्र का अविभाज्य अंग है, लेकिन साथ ही इसका गुजरात से भी एक ऐतिहासिक और मज़बूत रिश्ता है। सदियों से गुजराती और मराठी समुदायों ने मिलकर मुंबई को…
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 20, 2025
म्ही मतदान करा किंवा करू नका, मॅच फिक्सिंग झालीय- राज ठाकरे (Raj Thackeray On Muncipal Corporation Election 2025)
राज ठाकरेंनी 19 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील गोरेगाव येथे 'मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्याला' संबोधित केलं. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर पहिले मतदार यादी स्वच्छ करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू देत. सत्तेवर कोण येईल याच्याशी मला कर्तव्य नाही. पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तुम्ही मतदान करा किंवा करू नका, मॅच फिक्सिंग झालेलं आहे. अशा प्रकारच्या निवडणुका हा मतदारांचा अपमान आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार- राज ठाकरे, VIDEO:
संबंधित बातमी:
गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा..; मुंबईतून राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन



















