मुंबई : राज्याजील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, आता सत्तेत एकत्र असलेले पक्ष एकमेकांना इशारा देत टीका करत असल्याचं निदर्शनास आलं, या दरम्यान  'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे (रिपाई) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपबरोबर तडजोड केल्याची कुजबुज असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचं चित्र आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची एप्रिलमध्ये राज्यसभेची मुदत संपत आहे. केंद्रात असलेलं राज्यमंत्रीपद कायम राहण्यासाठी त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी हवी आहे. तीच संधी मिळवण्यासाठी भाजप कोट्यातून राज्यसभा मिळवण्यासाठी आठवले  (Ramdas Athawale) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपबरोबर तडजोड केल्याची कुजबुज असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Continues below advertisement

रामदार आठवले यांनी मुंबईत भाजपसोबत जाण्यासाठी एकूण १७ जागांची मागणी केली होती.मात्र अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत यावर समाधानकारक तोडगा निघालाच नाही. अखेर आठवले यांच्या ३९ कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवले यांच्याशी चर्चा झाली. भाजपा आणि शिवसेना यांनी प्रत्येकी ६ जागा 'रिपाई' ला देण्याचे मान्य केले आणि आधी या जागांवरचे त्या दोन्ही पक्षाचे उमेदवार अर्ज माघारी घेतील, असा निर्णय झाला. मात्र उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. 'रिपाइं 'च्या २६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 'रिपाइं'चे १३ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व स्वबळावर व महायुतीशी मैत्रीपूर्ण लढती करणार आहेत. यादरम्यान चर्चेसाठी तयार असलेल्या आठवलेंना तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सोशल मिडीयावरती संताप देखील व्यक्त केला होता.

तक राज्यसभेवरील जागेसाठी तडजोड झाली या चर्चेवरती रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी माहिती देताना सांगितलं की, मुंबईत भाजपने एकही जागा दिलेली नाही. त्याबाबत कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र राज्यातील उर्वरित महानगरपालिकांमध्ये भाजपने 'रिपाइं'ला सन्मानाने जागा दिल्या आहेत. राज्यसभा मिळवण्यासाठी पक्षाने तडजोड केली या आरोपात तथ्य नाही, असंही ते म्हणालेत.

Continues below advertisement

कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही

काही दिवसांपूर्वी आठवलेंची ही पोस्ट देखील चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल  दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल.