Ramdas Athawale : दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बारानंतर यवतमधील दोन गट आमनेसामने आले होते. यवतमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरूनराज्याचेराजकारणतापलेअसताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीभाष्यकरतटीकाकेलीआहे. एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचायका? असासवालत्यांनीयावेळीउपस्थितकेलाआहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेकि, मला असं वाटतं यवत असेल किंवा अजून कोणते शहर असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीचे वातावरण निर्माण होऊ नये. महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे आणि सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन वाद होणार नाही अशी दोन्ही बाजूने भूमिका ठेवली पाहिजे. एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचायका?असासवालत्यांनीयावेळीकेलाय.
महाराष्ट्रात हा सर्व जाती-धर्माचा महाराष्ट्र आहे - रामदास आठवले
दरम्यान, याघटनेकडेमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि दोन गटामध्ये जो वाद असेल तो मिटवावा. धार्मिक ताण त्यांनीवाढवू नये मला असं वाटतं. महाराष्ट्रात हा सर्व जाती-धर्माचा महाराष्ट्र आहे. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे वाद न वाढवणे असं माझं म्हणणं आहे. अशीप्रतिक्रियाहि खासदार रामदास आठवले यांनीदिली.
पुरावे देण्यामागे पोलिसांना असफलता आली- रामदास आठवले
मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात जे काही अधिकारी होते त्यांनी त्या ठिकाणी कोर्टमध्ये एव्हिडन्स द्यायचे होते, ते एव्हिडन्स देता आले नाही. सुरुवातीला आरोपींना पकडण्यात आलं होतं आणि नंतर ज्यावेळेला केस चांगली होती त्यावेळी या घटनेची त्यांचा संबंध आहे तेव्हा पुरावे होते ते पुरावे देण्यामागे पोलिसांना असफलता आली. म्हणून कोर्टाने जे लोक पकडले होते त्या लोकांना सोडले आहे. त्यामुळे कोर्टच निकाल आहे तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे.
पोलिसांनी दबावत राहता कामा नये, त्यांनी वर्दीचा मान राखला पाहिजे- रामदास आठवले
पोलिसांना दबाव त्या काळात काही असेल, पण पोलिसांनी दबावत राहता कामा नये. त्यांनी वर्दीचा मान राखला पाहिजे. अनेक वेळेला अनेक मुद्द्यांवर मी देखील पोलिसांशी बोललेलो आहे. मात्र पोलिसांनी मला असे सांगितले असे करता येणार नाही. त्याप्रमाणे पोलिसांनी कोणाचे ऐकू नये. कोण आरोपी आहेत आता केसचा निकाल लागलेला आहे. कोण आरोपी होते त्याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. पुढे त्याचा काय विचार होईल मला सांगता येत नाही. असेही खासदार रामदास आठवले म्हणाले.
आणखी वाचा
