एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...

Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: सुनेत्रा पवार यांच्या एका अटीने नवनीत राणा यांचे राज्यसभेचे स्वप्न भंगले. रवी राणांनी सगळं सांगितलं, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांबाबत काय म्हणाले?

Rajya Sabha Election  2026 Navneet Rana: राज्यसभेची जागा भाजपला मिळाली असती तर नवनीत राणा या खासदार झाल्या असत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यादृष्टीने नियोजन केले होते, असे वक्तव्य आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केले. राज्यसभेची जागा सुनेत्रा पवार यांची होती. ती जागा भारतीय जनता पार्टीला (BJP) मिळाली असती तर नक्कीच नवनीत राणा त्या ठिकाणी राज्यसभेवर  (Rajya Sabha Election  2026) जातील, अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा निश्चित केले होते, असे रवी राणा यांनी सांगितले. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला पाहिजे, अशी अट टाकली तेव्हा त्यावेळेस त्यांच्या भावना चांगल्या होत्या. त्यांच्या पक्षानेदृष्टीने चांगले लोक त्यांच्या पक्षामध्ये आले पाहिजेत. राज्यसभा म्हणून नवनीत राणा राष्ट्रवादी पक्षातर्फे गेल्या पाहिजेत, अशी भावना  सुनेत्रा पवार आणि  पार्थ पवार यांच्या मनामध्ये होती. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

मात्र, नवनीत राणा यांचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे विचार आहेत, हिंदुत्वाचे विचार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये नवनीत राणा काम करतात आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहील, असा निर्धार नवनीत राणा यांनी केला होता.  

नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून सातत्याने त्या विचारावर काम करून जनतेची सेवा करत राहतील. पदासाठी इकडे तिकडे उड्या मारण्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराने विचारला धरून काम केले पाहिजे, हा नवनीत राणा यांचा कायम संकल्प राहिलेला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांचे आभार मानले व मी शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम करत राहील, असे सांगितले.

 Eknath Shinde and Ravi Rana: मला एकनाथ शिंदेंनी ऑफर दिली होती: रवी राणा

एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्यादृष्टीने शिवसेनेत येऊन काम करण्याची ऑफर दिली होती. पण मी आधीच सांगितलं की, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून मी काम करत आहे. जिथपर्यंत राजकारणामध्ये देवेंद्र फडणीस आहेत, तिथपर्यंत त्यांच्यासोबत सुद्धा मी ताकदीने काम  करेन,मी कुठेही जाणार नाही. मी एकनाथजी शिंदे, बच्चू कडू यांचे आभार मानतो.

नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा मिळाली पाहिजे, असे अनेकांना वाटत होते. ती लोकांची इच्छा होती. ती जागा भारतीय जनता पक्षाला सुटावी ही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. नवनीत राणा यांची इच्छा होती, मी तसं सुनेत्रा पवार यांना सांगितलं होते. यासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा पॉझिटिव्ह होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवनीत राणा यांनी लढले पाहिजे, अशी अट त्यांनी टाकली होती, त्यामुळे त्यांनी दुसरा उमेदवार शोधला, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले.

Ravi Rana: माझ्या मंत्रि‍पदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील: रवी राणा

मला मंत्री बनवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. मला मंत्री बनवलं काय नाही बनवलं काय मला त्याची पर्वा नाही. एक सक्षम नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, विदर्भाचा आमदार मुख्यमंत्री आहे त्याचा आम्हाला गर्व आहे. जनतेची इच्छा आहे रवी राणा मंत्री झाले पाहिजे. या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू, यशोमती ठाकूर,अनिल बोंडे, प्रवीण पोटे हे मंत्री झाले. मात्र, आता मुख्यमंत्री जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील, असे रवी राणा यांनी सांगितले.

आणखी वाचा

पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
निष्ठा कोणाला सांगताय? राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, विधिमंडळात भास्कर जाधवांचा थेट अतुल भातखळकरांवर हल्लाबोल 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget