एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Rajya Sabha Election 2026 NCP: राज्यसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली आहे.

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची वर्णी लागली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभेच्या या जागेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव पक्के मानले जात होते. मात्र, रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोअर कमिटीच्या बैठकीत अनपेक्षितपणे राजेंद्र जैन यांचे नाव समोर येऊन त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच राजकीय वर्तुळाला काहीसा आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ यांनी आपले पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी अट ठेवली होती. हीच अट छगन भुजबळ यांच्या दिल्लीत राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2026)जाण्याच्या मार्गातील धोंडा ठरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. (Maharashtra Politics News)

राजेंद्र जैन यांची राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल पटकरे या जोडगोळीच्या अजूनही कायम असलेल्या वर्चस्वाची चर्चा रंगली आहे. यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत रायगडमध्ये भाजप आणि शिंदे गटात प्रचंड रस्सीखेच असतानाही सुनील तटकरे यांनी आपले सर्वपक्षीय संबंध आणि राजकीय अनुभव वापरुन त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नव्हे तर अनिकेत तटकरे यांची रायगड विधानपरिषदेतून बिनविरोध निवडही झाली. हे अर्थातच सुनील तटकरे यांचे यश मानले जात आहे. त्यापाठोपाठ रविवारी छगन भुजबळ यांच्यासारखा तगडा नेता रिंगणात असताना अनपेक्षितपणे शेवटच्या क्षणी प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली आहे. यानिमित्ताने राजकीय वर्तुळात तटकरे-पटेल यांच्या या यशाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नसल्याने एकच गहजब झाला होता. तटकरे-पटेलांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त तेव्हा पसरले होते. यानंतर काही दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साईडलाईन करण्यात आल्याचेही सांगितले जात होते. पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्या प्रचंड अंतर्गत धुसफूस असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील तटकरे आणि पटेलांचे स्थान डळमळीत झाल्याची भीती व्यक्त करत अनेकांनी त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, त्याच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अवघ्या महिनाभरातच अनुक्रमे अनिकेत तटकरे आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही आपला वरचष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. 

आणखी वाचा

छगन भुजबळांची 1 अट, दिल्लीचा आदेश आणि राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Vinayak Raut : ती घरातून जाताना स्त्रीधन, 10-12 बॅग भरुन कपडे घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रूपयांची डिमांड, विनायक राऊतांनी सगळंच काढलं
ती घरातून जाताना स्त्रीधन, 10-12 बॅग भरुन कपडे घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रूपयांची डिमांड, विनायक राऊतांनी सगळंच काढलं
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget