एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त 6 दिवस उरले, शरद पवार रुग्णालयात, राष्ट्रवादीने मविआकडे वेळ मागितला, नक्की काय घडलं?

Rajya Sabha Election 2026: भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत. रामदास आठवले, विनोद तावडेंच्या नावाची चर्चा, मविआचा उमेदवार शरद पवार?

Rajya Sabha Election 2026: येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (MVA Alliance) गोटात आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो. शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्यसभेची (Rajya sabha Election 2026) मुदत संपत असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. मात्र, शरद पवार सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे वेळ मागितला आहे. (Maharashtra Politics news)

राज्यसभा निवडणुकीसाठी 3 मार्चला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. सध्या अर्ज भरण्यासाठी सहा दिवस राहिलेले असताना महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार म्हणून कोणते नाव पाठवायचे? यावर अद्याप मविआची एकत्रित चर्चा झालेली नाही. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी मिळून संख्याबळानुसार एकच उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे आणि या एकाच जागेवर तिन्ही पक्षांकडून उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितला असून शरद पवार व आपल्या पक्षातील इतर नेत्यांसोबत एकत्र चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर शरद पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी संदर्भातला पुढचा निर्णय पक्ष महाविकास आघाडीला कळवला जाईल. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना दोन्ही पक्ष राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा करत असून दोन्ही पक्ष आपल्या पक्षाचे उमेदवार देण्यावर इच्छूक आहेत.

NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड उद्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही उद्या 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता वरळी डोम येथे होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,वर्किंग कमिटी सदस्य,राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी (आमदार/खासदार) यांचा समावेश असणार आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भातील प्रस्ताव हा बैठकीत मांडतील. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अनुमोदन देतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडेल.

आणखी वाचा

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, एक नाव ठरलं, विनोद तावडे अन् धैर्यशील पाटीलही शर्यतीत

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
BMC Samiti Election 2026 Shivsena UBT Uddhav Thackeray: BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget