Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागेल, अशी दाट शक्यता होता. मात्र, रविवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शेवटच्या क्षणी छगन भुजबळ यांचा पत्ता कापून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची (Rajya Sabha Election 2026) उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत विधिमंडळात आपला राज्यसभा उमेदवारी अर्जही भरला. यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टाकलेली अट कारणीभूत असल्याचा सांगितले जात असले तरी या सगळ्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रणनीती असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics News)

Continues below advertisement

ज्या परिस्थितीत छगन भुजबळ आहेत, त्यांना मंत्रीपद सोडायची इच्छा नसेल. राष्ट्रवादीत काय सुरू आहे यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय, याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आला आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले.  आज अशी राजकीय परिस्थिती आहे की, राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की, कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे, तो अधिकार त्या पक्षांकडे किती आहे याबाबत साशंकता आहे. सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री महोदय घेतात, त्यांच्या नेत्यांना कुठे ठेवावे, कोणती  जबाबदारी द्यावी, कोणाला कुठे पाठवावं, हे सगळे देवेंद्र फडणवीस हेच ठरवतात. या परिस्थितीत भुजबळ साहेबांकडे जे फडणवीस साहेब चर्चा करून सांगतील स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. 

Bacchu Kadu on Eknath Shinde CM post: मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल: विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळेच हे सरकार आलं हे काही लपून राहिले नाही. त्यांनी लाडकी बहीण आणि विविध योजना आणल्या, सरकारी तिजोरीतून एका कुटुंबात 30 हजार, 40 हजार तर कोणाच्या कुटुंबात लाख रुपये गेले. त्यावेळी सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे श्रेय होता, कारण ते मुख्यमंत्री होते, पण आज जे काही सांगितलं जातं की, मंत्र्यांना ठोकून काढा चुकलं तर, आमचे तर मंत्री नाही त्यांचेच मंत्री आहेत. बच्चू कडू  इशारा ते देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू  कडू यांनी स्वत:पासून करावी, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. 

Monsoon Rain Maharashtra: अत्यल्प पावसामुळे राज्यावर संकट: विजय वडेट्टीवार

आपण सगळे बघत आहोत की अल निनोमुळे प्रचंड भयावह परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. यावेळी पावसाचा अंदाज अत्यल्प दाखवण्यात आला आहे म्हणूनच या सगळ्यावर या परिस्थितीत देशापुढे पुढे काही प्रश्न आहेत. 22 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन आहे. मात्र आता कांद्यापासून अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांच नुकसान, मुंबईत दहा टक्के पाणी कपात सुरू झाले आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे  सगळे विषय घेऊन एक तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि त्यावर चर्चा केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

आणखी वाचा

'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...