Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार? पार्थ पवार, तटकरे, पटेल, भुजबळ सगळेच फडणवीसांच्या भेटीला, समीर भुजबळांनाही लॉटरी लागणार?

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात परतल्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेबाबत शनिवारी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या जागेवर अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांना संधी दिली जाऊ शकते. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली तेव्हापासूनच या जागेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सर्वात तगडे दावेदार मानले जात होते. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये अचानक भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना या जागेवरुन संधी मिळणार, अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी (Rajya Sabha Election 2026) उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Politics News)
छगन भुजबळ हे केंद्रात जात असले तरी राज्यात त्यांनी आपल्या वाट्याचे मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच मिळावे, असा आग्रह धरला आहे. केंद्रात छगन भुजबळ तर राज्यात छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. आता राष्ट्रवादीकडून याबाबत काही अधिकृत घोषणा केली जाणार का, हे बघावे लागेल. तसेच छगन भुजबळ यांच्या आग्रहाप्रमाणे समीर भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
आणखी वाचा
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj























