Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: राज्यसभेवर जायला तयार, पण छगन भुजबळांनी एक अट घातली, देवेंद्र फडणवीस प्रस्ताव ऐकून काय म्हणाले?

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याचा पेच अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. छगन भुजबळ यांनी शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडे तसा आग्रह केला. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. छगन भुजबळांच्या अटीबाबत 15 तास उलटून देखील अद्याप भाजप (BJP) हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. भाजप हायकमांडने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दर्शविल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही सांगितले जाते. (Rajya Sabha Election 2026)
शनिवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन भुजबळांची राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यातील मंत्रीपदाबाबतची भूमिका याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीपदाच्या फेर बदलाबाबत हायकमांडकडे विचारणा करावी लागेल, असे सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार आहे. मात्र, त्यांच्याकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती बड्या नेत्याने 'एबीपी माझा'ला दिली.
Sunil Tatkare news: तटकरेंच्या कुटुंबासारखा भुजबळांच्या कुटुंबाला न्याय का नाही?
छगन भुजबळ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या सुरुवातीपासूनच्या जडणघडणीत कशा प्रकारे भुजबळ कुटुंबाचा पुढाकार आहे. अजित पवार यांचं कुटुंब, तटकरे यांचं कुटुंब यांना जो न्याय लावण्यात आला तो भुजबळ कुटुंबाला का नाही? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. याच न्यायाप्रमाणे आपल्याला राज्यसभेवर पाठवून पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घ्यावे, असा छगन भुजबळांचा प्रस्ताव आहे.
NCP Vardhapan Din: यंदा दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईतच साजरा होणार
यंदा दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईतच साजरा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सकाळी 10 वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे वर्धापनदिन सोहळा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा षणमुखानंद हॉल येथे दुपारी 3 ते 5 वेळेत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांच्या निधनानंतरचा पहिलाच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षीय भाषणाकडे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत संघर्ष, प्रफुल पटेल सुनील तटकरे यांच पक्षातील स्थान, निवडणूक आयोगात देण्यात आलेली राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यावरून निर्माण झालेला गोंधळ याबाबत सुनेत्रा पवार काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ





















