एक्स्प्लोर

Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग

Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभा निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, राष्ट्रवादी हक्काची जागा सोडणार?

Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal and Navneet Rana: सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरुन सध्या महाराष्ट्रात रंजक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र, या सगळ्यात अचानक भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांची एन्ट्री झाली झाली होती. भाजप नवनीत राणा यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडायला सांगेल, असे बोलले जात होते. मात्र, शनिवारी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राज्यसभेच्या जागेवरील छगन भुजबळांचा दावा पक्का झाल्याची चर्चा होती. (Maharashtra Politics)

छगन भुजबळ यांनी काल पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास राज्य मंत्रिमंडळातील त्यांचे पद पुतणे समीर भुजबळ यांना देण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. मंत्री छगन भुजबळांच्या अटीबाबत 15 तास उलटून देखील अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आधी राज्यात समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ द्या आणि त्यानंतरच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरेन, अशी अट घालण्यात आली होती.

शनिवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन भुजबळांची राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यातील मंत्रीपदाबाबतची भूमिका याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीपदाचा फेर बदलाबाबत हायकमांडकडे विचारणा करावी लागेल, असे सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार  आहे. मात्र, त्यांच्याकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती बड्या नेत्याने 'एबीपी माझा'ला दिली. 

आणखी वाचा

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare On NCP Politics: आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
MPSC Online Exam Postponed: मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश
मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget