Rajya Sabha Election 2026: भारतीय संसदेच्या सर्वोच्च सभागृहांपैकी एक असलेल्या राज्यसभेच्या एप्रिल 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) कार्यक्रम जाहीर करताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षात (BJP) इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी निवडणूक ही केवळ संख्याबळाची लढाई नसून, पक्षांतर्गत निष्ठा विरुद्ध आयाराम या चर्चेचेही केंद्र बनली आहे. मागील काही वर्षांत बाहेरून पक्षात दाखल झालेल्या नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी दिली गेल्याची नाराजी भाजपमधील काही निष्ठावंत गटात आहे. “यावेळी तरी निष्ठावंतांना प्राधान्य द्यावे,” अशी मागणी पक्षातील एका गटाकडून पुढे येत आहे.

Rajya Sabha Election 2026: भाजपमध्ये ‘या’ नावांची चर्चा रंगली

राज्यसभेसाठी भाजपकडून काही प्रमुख नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Continues below advertisement
  • विनोद तावडे
  • रामदास आठवले
  • विजया रहाटकर
  • भागवत कराड
  • धैर्यशील पाटील

या पाच नावांची सर्वाधिक चर्चा असल्याचे समजते. 

Rajya Sabha Election 2026: निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्रातील ७ जागा 

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

6 मार्च – अर्जांची छाननी

9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख

16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

महाराष्ट्रातील 7 जागांसाठीची ही निवडणूक सत्तासमीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Rajya Sabha Election 2026: महायुतीचे संख्याबळ 

विधानसभेचे एकूण संख्याबळ 286 असून, दोन जागा रिक्त असल्याने प्रभावी संख्या 284 आहे. एका उमेदवाराला विजयासाठी 37 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे एकूण 235 आमदारांचे संख्याबळ असल्याने सहा जागा सहज जिंकण्याचे चित्र स्पष्ट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटप ‘4:1:1’ या फॉर्म्युल्यानुसार होण्याची शक्यता आहे. यात भाजपला 4 जागा, शिवसेनेला 1 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा मिळणार असल्याचे समजते.  

Rajya Sabha Election 2026: मविआसमोर एकजुटीचे आव्हान

तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आमदार, काँग्रेसचे 16 आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार असून एकत्रित 46 मतांच्या बळावर एक जागा निश्चित मिळू शकते. मात्र, ती कोणाच्या वाट्याला जाणार यावरून अंतर्गत चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील 'हे' सदस्य होणार निवृत्त  

  1. शरद पवार 
  2. रामदास आठवले
  3. फौजिया खान
  4. रजनी पाटील
  5. प्रियांका चतुर्वेदी
  6. धैर्यशील पाटील
  7. भागवत कराड

Rajya Sabha Election 2026: निष्ठावंत विरुद्ध आयाराम; भाजपमध्ये रस्सीखेच 

भाजपमध्ये यावेळी उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्याची परंपरा मोडून पक्षातील दीर्घकाळ काम केलेल्या निष्ठावंतांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणाला संधी देते आणि ‘निष्ठावंत विरुद्ध आयाराम’ या वादात कोणाचे पारडे जड ठरते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप