Raju Shetti नवी दिल्ली: आखाती देशात युद्ध सुरू असल्याने शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. भारत-अमेरिका कराराचा मोठा फटका शेतकऱ्यांवर बसणार आहे. भारताचं परराष्ट्र धोरण 100 टक्के चुकलं आहे. अशीटीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीसरकारवरकेलीआहे. शेतकरी संघटनेची पुढची रणनीती काय असावी, यावर काल बैठक पार पडली. देशभरातील शेतकरी नेते या बैठकीला आले होते. मुंबई पोर्टमध्ये कांदा, द्राक्ष, साखर असा शेतीमाल पडून आहे. नाशिवंत माल खराब झाला आहे. यंदा कोकणातील जवळपास सगळा आंबा खराबहोण्याचामार्गावरआहे. उत्पादन जारी घटलं असल तरी याची निर्यात पूर्ण थांबली आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे. अशीटीकाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीकेलीआहे.

Continues below advertisement

दरम्यान, आम्ही व्यापक देशव्यापी आंदोलन करण्याची तयारी करत आहोत. पुढच्या आठवड्यात आंदोलन कस करायचं, यावर निर्णय होईल. बंगाल आणि आसामच्या निवडणुका झाल्यानंतर डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. जर हे डिझेलचे दर वाढले तर शेतीच्या मशागतीचा दर सुद्धा वाढणार असल्याचेहीभाकीत राजू शेट्टी यांनी केलेआहे.

Raju Shetti : काहीही दोष नसलेला शेतकरी भरडला जातोय

Continues below advertisement

राज्यातअवकाळी पावसाने शेतीचंमोठं नुकसान केलंआहे. ज्वारी, गव्हाची कापणी राज्यात सुरू आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने फळबागा, भाजीपाला यांच नुकसान झालं आहे. आंब्याच देखील खूप मोठं नुकसान झालेल आहे. वातावरणातील बदलामुळे हे सगळ होत आहे. या सगळ्यात भरडला जातोय तो काहीही दोष नसलेला शेतकरी. असेही राजू शेट्टी म्हणाले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आंब्याच मोठं उत्पादन होत असतं. आंब्याला मोहर न आल्याने आता मार्केटमध्ये आंबाच नाही. आंब्यासाठी लागणारा सगळा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. आंब्याच्या एका कलमाला खर्च येतो 4 ते 5 हजार रुपये. मात्र सरकारने नुकसान भरपाई दिली आहे 220 रुपये. कामगारांची मजुरी जेवढी आहे त्यापेक्षा कमी पैसे सरकार शेतकऱ्यांना देत आहे. राज्यात येत असलेला आंबा हा परप्रांतीय आहे. असेहीतेम्हणाले.

Raju Shetti: on Election : पोटनिवडणुका लढवून विरोधकांनी जनतेला वेठीस धरू नये

शक्तिपीठ महामार्गात बदल केल्याच्या मीही बातम्या वाचल्या आहेत की महामार्ग बदलला आहे. 56 किलोमीटर अंतर वाढत आहे अस मीही वाचलं. माझं मत स्पष्ट आहे की, जुना रस्ता चांगला असताना हा नवा रस्ता करण्याचा अट्टाहास सरकार का करत आहे? यातच मला काहीतरी काळबेरं वाटत आहे. तर पोटनिवडणूक राज्यात कशा लढवल्या जात आहेत हे आपण पाहत आहोत. या पोटनिवडणुका लढवून विरोधकांनी जनतेला वेठीस धरू नये असेहीराजूशेट्टीम्हणाले.