एक्स्प्लोर

Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: कुठलीही चर्चा नसताना राज्यसभेची उमेदवारी मिळाली; राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: राज्यसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Politics) सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी फेटाळलं आहे. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

राजेंद्र जैन काय म्हणाले? (Rajendra Jain On Rajya Sabha Nomination)

मी मध्यवर्ती सहकारी बँकेत 19 वर्षांपासून आहे. माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे. विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे स्वप्न जे आहे त्या पद्धतीने मी आज काम कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. त्या पद्धतीने मी काम करणार. सर्व माझे प्रमुख नेते आणि अजितदादा यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. जी माझी काम करण्याची पद्धत आहे एक सामान्य कार्यकर्त्याला सर्व नेत्यांनी आशीर्वाद दिला आहे, त्यावर मी खरा उतरणार असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी दिली. माझे वरिष्ठ नेते आणि माझ्या वडिलांसारखे आहेत आमच्या पक्षात नाराजी वगैरे काही राहत नाही. ते माझे वडिलांप्रमाणे आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. 15 वर्षात त्यांनी मला अनेकदा आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही सर्वजण एक संघ आहोत. कोणताही शब्द नाही. फक्त पक्षाचं काम केलं एकनिष्ठ आणि इमानदारीने आज त्याचं फळ मिळालं, असं राजेंद्र जैन म्हणाले. 

कोण आहेत राजेंद्र जैन? (Who Is Rajendra Jain)

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला. विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.

राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

  • नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
  • नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
  • मतदानाची तारीख (Date of Poll): 18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
  • मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)

संबंधित बातमी:

Chhagan Bhujbal-Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: छगन भुजबळांची 1 अट, दिल्लीचा आदेश आणि राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Navneet Rana : लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी दुसऱ्यांच्या दारात गेली नाही, त्याला ठोकर मारली : नवनीत राणा
लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी दुसऱ्यांच्या दारात गेली नाही, त्याला ठोकर मारली : नवनीत राणा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget