एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal-Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: छगन भुजबळांची 1 अट, दिल्लीचा आदेश आणि राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

Chhagan Bhujbal-Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

Chhagan Bhujbal-Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Politics) सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी फेटाळलं आहे. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून छगन भुजबळांच्या अटीला लाल कंदील देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना मंत्रीपद द्या, त्यानंतर मी राज्यसभेवर जातो, अशी अट छगन भुजबळांनी ठेवली होती. मात्र शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली. यानंतर समीर भुजबळ यांना मंत्रीपदी वर्णी लागत नसल्यामुळे छगन भुजबळ यांनी दिल्लीला जाण्यास नापसंती दर्शवली. भुजबळांच्या नापसंतीनंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सकाळी साडे दहा वाजता विधानभवनात जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यात येणार आहे. 

राजेंद्र जैन काय म्हणाले? (Rajendra Jain On Rajya Sabha Nomination)

मी मध्यवर्ती सहकारी बँकेत 19 वर्षांपासून आहे. माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे. विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे स्वप्न जे आहे त्या पद्धतीने मी आज काम कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. त्या पद्धतीने मी काम करणार. सर्व माझे प्रमुख नेते आणि अजितदादा यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. जी माझी काम करण्याची पद्धत आहे एक सामान्य कार्यकर्त्याला सर्व नेत्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यावर मी खरा उतरणार असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी दिली. माझे वरिष्ठ नेते आणि माझ्या वडिलांसारखे आहेत आमच्या पक्षात नाराजी वगैरे काही राहत नाही. ते माझे वडील धारे आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. 15 वर्षात त्यांनी मला अनेकदा आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही सर्वजण एक संघ आहोत. कोणताही शब्द नाही. फक्त पक्षाचं काम केलं एकनिष्ठ आणि इमानदारीने आज त्याचं फळ मिळालं, असं राजेंद्र जैन म्हणाले. 

कोण आहेत राजेंद्र जैन? (Who Is Rajendra Jain)

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला. विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.

राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

  • नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
  • नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
  • मतदानाची तारीख (Date of Poll): 18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
  • मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)

संबंधित बातमी:

Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget