Rajabhau Waje Father on Operation Tiger : शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. या राजकीय घडामोडी आज सुरू आहे, मात्र दीड वर्षांपूर्वी राजाभाऊंना (Rajabhau Waje) ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी बोलवले होते. राजाभाऊ वाजे यांनी एकनाथ शिंदे यांना माझ्या वडिलांशी बोलावं लागेल, असे सांगितले होतं. दोन लोक 14 एप्रिलला आमच्या घरी आले होते. त्यांनी देखील आम्हाला ऑफर दिली. मोठा विकास निधी मिळेल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. मात्र राजाभाऊ वाजे यांनी मला ते लोक भेटायला आले असे सांगितलं, मात्र रात्री उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलो आणि सांगितलं की हा निर्णय होणार नाही. मी त्यांना नकार दिला. ठाकरे गटात काही राहिले नाही, खासदार-आमदार गेले, काही खासदार जाण्याच्या तयारीत आहे. तुम्ही देखील सोबत या विकास निधी देतो, अशी आम्हाला ऑफर दिली. मतदार संघाला लोकसभा विधानसभेत मोठी मदत होईल असं त्यांनी त्यावेळी मला सांगितलं विकास निधी असा शब्द वापरून ऑफर दिली, थेट पैशाची ऑफर दिली नाही. एकनाथ शिंदे साहेब (Eknath Shinde) स्वतः तुमचा योग्य तो मान राखतील, असं त्यांनी सांगितल्याचागोप्यास्फोट राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे वडील प्रकाश वाजे (Prakash Waje)यांनीकेलाआहे.
Prakash Waje: नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना फोन, घडलेलंसगळंसांगितलं
ठाण्याचे ते दोन लोक येऊन गेल्यानंतर मी रात्री उशिरा दीड-दोन वाजता नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना फोन केला. मी स्वतः उद्धव ठाकरे यांना सांगितलं, ठाण्याचे दोन लोकं आले होते. त्यांना मी निरोप दिला आहे, पक्षांतर शक्य नाही असं मी उद्धव ठाकरेंना सर्व सांगितले. आम्ही राजकीय लोक नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यांनी 2019 ची देखील ऑफर दिली होती. असेही प्रकाश वाजे म्हणाले.
आम्हाला 29 मध्ये काही करायचंच नाही, पुढची लोकसभा निवडणूक वाजे लढणार नाही, असंही प्रकाश वाजे म्हणाले. लोकसभेला देखील आमचं नाव चर्चेत आलं होतं. आम्ही त्यावेळी पक्षाला सांगितलं एवढा मोठा मतदारसंघ आम्हाला झेपणार नाही, आमच्या नावाचा विचार करू नका, असे मी स्वतः सांगितलं होतं. राजभाऊ वाजे यांनी ठाकरे यांना सांगितलं आणि मी स्वतः शरद पवार यांना भेटून उमेदवारी न करण्याचं सांगितलं होतेअसेही प्रकाश वाजे म्हणाले.
Prakash Waje: वाजे यांना पैशाची काय गरज? राजकीय शिंतोडे आमच्यावर का?
आम्हाला पवार नवीन नाही आणि पवारांना आम्ही नवीन नाही, तीन पिढ्यांपासून आम्ही राजकारणात आहोत. सध्या सुरू असल्या राजकीय घडामोडीनंतर मी शरद पवारांना निरोप पाठवला, त्यांची तब्येत बरी नाही मी त्यांच्याकडे हे सर्व सांगितलं. ठाकरे आणि आमचे (वाजे) राजकीय संबंध पवार आणि आमचे कौटुंबिक संबंध आहे. सध्या राजकीय चर्चा सुरू आहे. आमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सांगतो. साठ एकर जागा आहे, एक बंगला, गावात दोन घर, 20 एकर शेतीत फार्म हाऊस आहे. दोन मुली आहेत, त्यांचं लग्न झालं आहे. राजाभाऊ वाजे यांना पैशाची काय गरज? राजकीय शिंतोडे आमच्यावर उडून घेण्याची गरज नाही? असेहीतेम्हणाले.
Rajabhau Waje Father: शिवबंधन बांधताना उद्धव ठाकरेंनीविचारलं, तुम्ही किती दिवस शिवसेनेत राहणार? मी म्हणालो...
मागची नगर परिषदेची निवडणूक झाली, आम्ही निवडणूक लढवली सत्तेच्या सोबत असलेले कोकाटे यांच्यापेक्षा एक जागा आम्ही जास्त निवडून आणली, भाजप दोन जागेवर निवडून आले. राजाभाऊ वाजे यांची उठबस बघता लोकांसोबत आमचे दोन दोन पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही. राजाभाऊ वाजे हे शिवसेनेत प्रवेश करत असताना शिवबंधन बांधताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना विचारलं, तुम्ही किती दिवस शिवसेनेत राहणार? राजाभाऊ वाजे यांनी शिवबंधन बांधताना सांगितलं तुम्ही आणि मी असेपर्यंत शिवसेनेत राहणार. आज शिवसेना एकनाथ शिंदे यांची असली तरी देखील राजाभाऊ वाजे यांना ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, त्यामुळे आम्ही ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. असेही प्रकाश वाजे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
