Shivsena Thackeray Camp & MNS BMC seat Sharing formula: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीची आज घोषणा होणार आहे. मुंबईसह सात नगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष एकत्रित लढणार आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुंबईची लढाई ही त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी दुपारी 12 वाजता एकत्र येऊन युतीची घोषणा करतील. तत्पूर्वी हे दोघे भाऊ दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज युतीच्या घोषणेवळी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटप ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने पूर्ण केल्यानंतर आज युतीची अधिकृत घोषणा होत आहे. नेमका जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार? कोण किती जागा लढवणार? मित्र पक्षांना किती जागा देणार? यासंबंधी एबीपी माझा ने ठाकरे बंधूंच्या युतीचा संभाव्य फॉर्मुला समोर आणला आहे. जागावाटप हे उमेदवाराच्या मेरिटनुसार झाला असून साधारणपणे 60 ते 70 जागा या ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसे पक्षासाठी सोडल्या आहेत तर 140 ते 150 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने आपली उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत जागा वाटपाची बैठक अंतिम टप्प्यात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधुनो सोबत आल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. त्यावेळी अमित शाह उपस्थित होते.

Continues below advertisement

BMC Election Seat Sharing: ठाकरे बंधूंच्या युतीचा फॉर्म्युला काय असणार?

शिवसेना ठाकरे गट - 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष -60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार 

BMC Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीसोबत आल्यास फॉर्मुला नेमका काय असणार?

 शिवसेना ठाकरे गट - 130 ते 140 जागांवर निवडणूक लढवणार  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 15 ते 20 जागा शिवसेना ठाकरे गटातील कोट्यातून सोडणार 

आणखी वाचा

एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाण यांच्यात 5 तास मॅरेथॉन चर्चा; पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक, अंतिम यादीवर शिक्कामोर्तब?