Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'उद्धवराज'...महाराष्ट्र नव्हे, दिल्लीला पण धडकी भरली; मराठी माणसं म्हणाली, होऊदे पहाट नवी!
Raj Thackeray-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येताच महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊ शकतं, यावर नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन देखील केले होते. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. त्यामुळे अनेक मराठी माणसांना याचा आनंद झाला. परंतु आता राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआरचं रद्द केल्याने ठाकरे बंधूंचा मुंबईतील मोर्चा होणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येताच महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊ शकतं, यावर नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
ठाकरे बंधू फक्त एकत्र येणार अशी चर्चा झाली. तर महाराष्ट्र नाहीतर दिल्लीला पण धडकी भरली..'उद्धवराज' असं लिहित फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच मराठीसाठी एकत्र आले, तसेच भविष्यातही महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, असंही म्हटलं जात आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू एकत्र येणे गरजेचे आहे. परप्रातियांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येणे गरजेचं आहे..होऊ दे पहाट नवी...असं म्हणत मराठी माणूस सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र विजयी जल्लोष करणार?
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे, म्हणजेच त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर, 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मोर्चा आणि जल्लोष करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैला विजयी मोर्चा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे, अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात 5 जुलैच्या सभेत सामील व्हायचे की नाही, याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
























