एक्स्प्लोर

Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: ठिकाण बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक; दादरच्या शिवाजीपार्कमध्ये काय घडलं?

Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज 13 वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने अगदी सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर (Balasaheb Thackeray Memorial) अभिवादन करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. 

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडावेळ बसले. गेल्या अनेक महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकवेळा एकत्र दिसले. तसेच दिवाळी, भाऊबीजसह अनेक कार्यक्रमात ठाकरे कुटुंबही एकत्र आले होते. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काहीवेळ चर्चाही झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचंही दिसून आले. 

संजय राऊतही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले- (Sanjay Raut Balasaheb Thackeray Memorial)

प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले.

संबंधित बातमी:

Sanjay Raut: दुर्धर आजार होऊनही बाळासाहेबांसाठी संजय राऊत अखेर घराबाहेर पडलेच, तोंडाला मास्क लावून शिवसैनिकांच्या गराड्यात स्मृतीस्थळावर पोहोचले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Yogesh Kadam on Sunil Tatkare: मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल, रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार, म्हणाला, 'आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही'
मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल, रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार, म्हणाला, 'आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही'
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
PM Modi Parliament Monsoon Session 2026:
"हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार; अंतराळापासून ते तंत्रज्ञानापर्यंत भारताचे यश"; पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटलं?

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Embed widget