एक्स्प्लोर

Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं...

Raj Thackeray on Inquilab zindabad: राज ठाकरे यांनी काल ठाण्यात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनाही राज यांनी लक्ष्य केले.

Raj Thackeray on Inquilab zindabad: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात देशाचा जीडीपी, बेरोजगारी, धर्मांधता, मराठी-हिंदी वाद अशा विविध मुद्द्यांवरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राज ठाकरे यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. मात्र, या भाषणानंतर घडलेला आणखी एक प्रसंग राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आगामी राजकीय दिशा दाखवून देणारा ठरला. राज ठाकरे यांनी काल ठाण्यात साधारण पाऊस तास भाषण केले. या भाषणात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांची पिसं काढली. हे भाषण संपल्यानंतर राज ठाकरे पोडिअमवरुन बाजूला झाले आणि स्टेजवरुन उतरण्यासाठी खाली जात होते. त्याचवेळी समोरुन मनसेचे काही कार्यकर्ते घोषणा देत होते. यापैकी एक घोषणा ऐकून राज ठाकरे गर्रकन मागे वळले. ते मागे वळून पुन्हा माईकच्या दिशेने निघाले. तेव्हा काहीवेळ मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय झालं, हेच समजत नव्हतं. आपल्या तोंडातून काही अद्वातद्वा शब्द बाहेर पडला की काय आणि आता राज ठाकरे माईकवरुन सर्वांदेखत कानउघडणी करणार की काय, अशी भीती काहींना वाटली. (Maharashtra Politics)

राज ठाकरे यांनी पुन्हा माईकचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या करड्या आणि रोखठोक आवाजाच कार्यकर्त्यांकडे पाहून विचारलं की, 'इन्कलाब जिंदाबाद कोण म्हटलं?' त्यावर साहजिकच समोरुन लगेच उत्तर आले नाही. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की,  इन्कलाब जिंदाबाद (Inquilab zindabad) ही घोषणा द्यायची बरं का... ही भगतसिंगांची घोषणा आहे.' एवढं सांगून राज ठाकरे पुन्हा माघारी वळले आणि निघून गेले. मात्र, हा प्रसंग अनेकांच्या मनात कोरला गेला. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात, 'देवावर श्रद्धा असू द्या, धर्माचा अभिमान असावा, पण धर्मांध होऊ नका', हा सल्ला आवर्जून दिला. भाजपकडून गेल्या काही काळात सातत्याने राष्ट्रीयत्त्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भर देत राजकारण केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच संसदेत 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीतासंदर्भात महत्त्वाचा कायदा मंजूर करण्यात आला. भाजपने यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत लोकप्रिय घोषणा ठरलेल्या 'इन्कलाब जिंदाबाद'चे महत्त्व मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आवर्जून लक्षात आणून दिले. 'वंदे मातरम' इतकेच 'इन्कलाब जिंदाबाद' महत्त्वाचे आहे, असे सांगितले. त्यामुळे या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आणखी वाचा

Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Jantar Mantar Protest: निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी; कार्यकर्त्यांना पोलिसांचे फोन अन् धमक्या? कार्यकर्त्यांची धरपकड
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी; कार्यकर्त्यांना पोलिसांचे फोन अन् धमक्या? कार्यकर्त्यांची धरपकड
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Jalgaon Crime: पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
पैशांचा वाद विकोपाला गेला, 21 वर्षीय भूषणचा काटा काढला; नंतर फुटपाथवर बॉडी फेकली अन्...; जळगाव हादरले!
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Nana Patekar: ‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?
‘आग लागण्याची वाट पाहायची का?’ जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकर का संतापले होते? नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
Embed widget