Raj Thackeray on Adani: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर झालेल्या जाहीर सभेत, गेल्या दहा वर्षांत मुंबईसह देशभरात अदानी समूहाने कशा पद्धतीने आपला विस्तार केला, यावर आधारित एक व्हिडीओ सादर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून 2014 पूर्वी देशात मर्यादित अस्तित्व असलेल्या अदानी समूहाला भाजपच्या सत्ताकाळात मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प व जमिनी कशा मिळाल्या, हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) आता राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Continues below advertisement

Amit Satam on Raj Thackeray: ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस....

काही वर्षांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. गौतम अदानी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. आता याच भेटीचा दाखला देत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. या भेटीचे फोटो 'एक्स' माध्यमावर शेअर करत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. "ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस" , असे म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.  

Raj Thackeray on Gautam Adani: नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे? 

दरम्यान, राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत त्यांच्या नेहमीच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या शैलीत एक व्हिडीओ सादर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून 2014 साली देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अदानी समूहाने देशभरात कशा पद्धतीने आपला विस्तार केला, हे दाखवण्यात आले. व्हिडीओमध्ये एका नकाशाच्या माध्यमातून 2014 नंतर प्रत्येक वर्षी अदानी समूहाला कोणकोणते प्रकल्प मिळत गेले, याचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले होते. या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मुंबई विमानतळाची जागा अदानी समूहाला विकण्याचा डाव असल्याचा आरोप केला. राज ठाकरे म्हणाले की, अदानी समूह पूर्वी सिमेंट उद्योगात नव्हता, मात्र गेल्या दहा वर्षांत तो देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक बनला आहे. आज देशातील बहुतांश सरकारी प्रकल्पांमध्ये अदानी समूहाच्या कंपनीचेच सिमेंट वापरले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. यासोबतच, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ आधीच अदानी समूहाच्या ताब्यात गेले असून, वाढवण येथे प्रस्तावित विमानतळही त्यांच्याच ताब्यात जाण्याची शक्यता असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. मात्र, एकाच उद्योगपतीला अशा पद्धतीने मोठे केले जात आहे, हे मला मान्य नाही,” असे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

आणखी वाचा 

Raj Thackeray: राज ठाकरेंनी मनसेच्या दुखावल्या गेलेल्या मावळ्यांना साद घातली, पक्षाला 'जय महाराष्ट्र' केलेल्यांबाबतही महत्त्वाचं भाष्य; नेमकं काय म्हणाले?