एक्स्प्लोर

Raj Thackeray On Uddhav Thackeray: आमची माणसं उद्धव ठाकरेंसोबत बोलणार; राज ठाकरेंचं मोठं विधान, ठाकरे बंधू एकत्र येणार?

Raj Thackeray On Uddhav Thackeray: मुंबईत 6 जुलै रोजी विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना येण्याचं आव्हान राज ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray On Uddhav Thackeray मुंबई: राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्तीच्या संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचपार्श्वभूमीवर 6 जुलै रोजी विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना येण्याचं आव्हान राज ठाकरेंनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत देखील आमची माणसं बोलतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

6 जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाने यावं. मोर्चात कोणत्याही पार्टीचा झेंडा नसेल. मोर्चाचं नेतृत्व मराठी माणसाकडे असेल. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघणार आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. मोर्चात सर्व साहित्यिक,तज्ज्ञांनी सहभागी व्हावे. मोर्चात विद्यार्थी आणि शिक्षकांनी यावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. सर्वांना सहभागी व्हावं म्हणून रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच मोर्चाला कोण येणार नाही ते पाहणार, असं राज ठाकरे म्हणाले. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट- राज ठाकरे

हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. त्यामुळे, 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल, मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, अशी घोषणाच राज ठाकरेंनी यावेळी केली. तसेच, महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट आहे, मी कट बोलतोय कारण हा कटच आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

संबंधित बातमी:

Dada Bhuse Meets Raj Thackeray: मला मान्य नाही...; हिंदी भाषा सक्तीवरुन दादा भुसे सरकारची भूमिका मांडायला गेले, राज ठाकरे काय काय म्हणाले?

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Municipal Corporation: अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख

व्हिडीओ

Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Embed widget