एक्स्प्लोर

मोठी बातमी! राज ठाकरे थेट मातोश्रीवर; आधी कार्यक्रमात भेटले, संजय राऊत अन् उद्धव ठाकरेंशी हसत-खेळत गप्पा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे कार्यक्रमातन बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मुंबईत ठाकरे बंधूंच्या सातत्याने वाढत्या भेटी महाराष्ट्रातील नव्या राजकीय वाटचालीचे संकेत देत आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी याआधी युती संदर्भात दोन्ही नेत्यांची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती होती, त्यानंतर पुन्हा एकदा आता राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर आल्याने शिवसेना-मनसेच्या युतीची चर्चा होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात ठाकरे बंधू 5 वेळा एकत्र आले आहेत. मुंबईतील (Mumbai) वांद्रे एमसीएमध्ये संजय राऊत यांच्या नातीचा बारशाचा कार्यक्रम होता. त्यासाठी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या, यावेळी संजय राऊतांसह इतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना, हसताना देखील दोघांचा व्हिडिओ दिसून येत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे कार्यक्रमातन बाहेर पडले. त्यावेळ स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला. रश्मी ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाहेर आल्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन केले होते. त्यामुळे, कौटुंबीक कार्यक्रमातील भेटीमुळे वातावरण देखील हलकेफुलके होते. मात्र, या भेटीनंतर राज ठाकरे शिवतीर्थ बंगल्यावर न जाता थेट मातोश्रीवर गेल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या भेटीला पुन्हा मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप आला नाही.

राज ठाकरे मातोश्री निवास्थानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला (Raj Thackeray and uddhav Thackeray)

5 जुलै रोजी मराठी भाषा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर, 27 जुलै 2025 रोजी राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी मनसे-शिवसेना उबाठा युतीच्या चर्चा सुरू आहेत, मागील अनेक वर्षे दुरावा असलेल्या बंधूंमध्ये जवळीक वाढून थेट युतीचा चर्चा सुरू झाल्याने राज्याचे लक्ष ठाकरे बंधूंकडे लागले आहे. त्यातच, गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू सातत्याने भेटीगाठी वाढवत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, गेल्या 3 महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 5 वेळा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

ठाकरे बंधूंची 3 महिन्यात 5 वेळा भेट (Shivsena MNS Alliance)

5 जुलै 2025 ला मराठी भाषेच्या मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यानंतर, 27 जुलै 2025 रोजी मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली आणि थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले होते. तर, 27 ऑगस्ट 2025 या भेटीच्या चर्चा राजकारणात तग धरून होत्याच आणि तब्बल 2 दशकानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरच्या गणेशोत्सवाचे निमित्त घेऊन शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थिती दाखवली. तसर, 10 सप्टेंबर रोजी गणेश मुहर्त ह्या भेटीचे निमित्त ठरला पण गप्पा मात्र अपुऱ्या झाल्य आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. आता, 5 ऑक्टोंबर रोजी ते संजय राऊत यांच्या कौटुंबीक कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत. 5 जुलै रोजी पुन्हा एकत्र आलेल ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीत युती करून सामोरे जाणार का? या चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेत पुन्हा तीन महिन्यात पाचव्यांदा ठाकरे बंधू आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र सहकुटुंब पाहायला मिळाले.

हेही वाचा

शिर्डी साईंच्या जिल्ह्यातून अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत स्पष्टच सांगितलं

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget