Raj Thackeray Meet Eknath Shinde मोठी बातमी: राज ठाकरे भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ!
Raj Thackeray Meet Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray Meet Eknath Shinde मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात नुकत्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची आज (18 फेब्रुवारी) भेट झाली. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. (Raj Thackeray Meets Eknath Shinde)
सुषमा अंधारे काय म्हणाल्या? (Sushama Andhare On Raj Thackeray)
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली. त्यावर येवढं मोठं काही करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते जरी असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी कोणाला भेटायला जावं, जाऊ नये, यावर आम्ही काही बोलू शकत नाही. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यामध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. एका पक्षाचे प्रमुख राज्याच्या उपमुख्यमंत्र्याना भेटतात, यामध्ये नक्कीच काहीतरी कारणं असू शकतात, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले.
मागील 4 वर्षांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वेळा अधिकृत आणि अनौपचारिक भेटी- (Raj Thackeray Meet Eknath Shinde)
- सप्टेंबर 2022: मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन गणपती दर्शन घेतले.
- नोव्हेंबर 2022: 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते.
- डिसेंबर 2022: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
- मार्च 2023: गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
- जुलै 2023: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी जाऊन विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
- ऑगस्ट 2024: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास आणि पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.
- सप्टेंबर 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा 'वर्षा' निवासस्थानी गेले होते.
- एप्रिल 2025: 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि एकत्र जेवण केले.
- फेब्रुवारी 2026: नुकत्याच (18 फेब्रुवारी 2026) झालेल्या माहितीनुसार, विविध शासकीय आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्यात पुन्हा भेट झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर: सत्तांतरानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतच त्यांच्यात 5-6 भेटी झाल्या होत्या. त्यानंतर 2023 ते 2026 या काळात सण-उत्सव, चित्रपट मुहूर्त आणि राजकीय खलबतांच्या निमित्ताने त्यांच्यात अंदाजे 10 ते 15 पेक्षा जास्त वेळा भेटी झाल्याचे दिसून येते.

























